Vikram Kumar : केशव नगरकरांची डासांपासून सूटका? डासांच्या समस्यांवर एका आठवड्यात उपाययोजना करणार; महापालिका आयुक्तांचं आश्वासन
डासांच्या समस्यांवर एका आठवड्यात उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माजी आमदार जगदीश मुळीक यांनी पुणे शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात भेट घेतली.
पुणे : पुण्यातील काही भागांमध्ये सध्या डासांचे प्रमाण (Mosquitoes Tornado) प्रचंड वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुंढवा (Mundhwa), केशव नगर परिसरातील डासांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या डासांच्या समस्यांवर एका आठवड्यात उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी दिले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माजी आमदार जगदीश मुळीक यांनी पुणे शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माजी आमदार आणि भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी भेट घेऊन पुणे शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. त्यांनी पुण्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. पुणे शहराचा विकास आराखडा अंमलबजावण्याची सद्यस्थिती आणि पुढील नियोजन,गणेश खिंड रस्त्यासह शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाय योजना, मुळा मुठा नदी शुद्धीकरण आणि नदी काठ सुशोभीकरण सद्यस्थिती,नदीपात्र आणि विविध भागातील तलावांमध्ये जलपर्णी वाढल्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली डासांची समस्या आणि उपाय योजना या विषयांवर चर्चा केली.
यावेळी डासांच्या समस्यांवर एका आठवड्यात उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. शहराच्या विविध भागात डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. नदीची आस्वच्छ्ता आणि वाढत्या जलपर्णीमुळे ही समस्या झाली आहे. खराडी येथील जलपर्णी काढण्याचे काम प्राधान्याने हाती घेणार आहे. तसेच मुला मुठा नदी आणि शहरातील तलावांतील जलपर्णी काढण्याचे काम वेगात करणार असल्याचं ते म्हणाले. त्यासोबतच विविध विषयांवर बैठक घेऊन नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी जगदीश मुळीक म्हणाले, नुकतेच जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने पुणे व्हिजन ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींनी मार्गदर्शन केले. या परिषदेत पुढील काही विषयांमध्ये तातडीने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आले. त्या विषयांवर भेट झाली. त्यासोबत पुण्यातील विविध परिसरातील विविध समस्यांबाबतदेखील चर्चा झाली.
जगदीश मुळीक अॅक्शन मोडवर
मागील काही दिवसांपासून जगदीश मुळीक हे पुण्यातील प्रश्न आणि समस्यांसंदर्भात अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. या निडणुकीसाठी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय भावी खासदार म्हणून त्यांचे बॅनर्स झळकले आहेत. हे सगळं असताना पुण्यातील विविध समस्यांसाठी ते काम करताना दिसत आहे.
डासांची संख्या का वाढली?
केशवनगर, खराडी आणि मुंढवा येथील मुळा-मुठेचे नदीपात्र डासांची सख्या वाढण्याचे मुख्य कारण आहे. या नदीपात्रालगत लहानसे धरण आणि पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. यामुळे नदीपात्रात जास्त पाणी साठत आहे. साचलेले पाणी हे डासांच्या प्रजननासाठीअनुकूल आहे. त्यामुळे याठिकाणी डासांची संख्या वेगाने वाढत आहे. यापूर्वी रशिया आणि मध्य अमेरिकेत पावसाळ्यात डासांच्या झुंडींमुळे वावटळ निर्माण होण्याचे प्रकार पाहण्यात आले आहेत.
#WATCH | Pune, Maharashtra: Swarms of mosquitoes form tornadoes in the skies of Keshavnagar and Kharadi Gavthan areas. The menace is caused by the elevated water levels of the Mula Mutha River. pic.twitter.com/ynD0zlyyAR
— ANI (@ANI) February 11, 2024
इतर महत्वाची बातमी-
Daund News : दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे निलंबित; नेमकं काय आहे प्रकरण?