एक्स्प्लोर

Jagdish Mulik On Jitendra Awhad: "बरं झालं मुंब्र्याच्या औरंग्यानं गरळ ओकली"; जगदीश मुळीकांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार

Jagdish Mulik : भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार असे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला होता. त्यावर आता जगदीश मुळीक यांनीदेखील पलटवार केला आहे.

Jagdish Mulik : भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार असे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला होता. त्यावर आता जगदीश मुळीक यांनी देखील पलटवार केला आहे. मुळीकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा उल्लेख औरंगजेब करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जगदीश मुळीकांनी ट्वीट करत आव्हाडांवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यासोबतच वाढदिवस साजरा करणार नसल्याचं निवेदन असलेलं बॅनरही त्यांनी पोस्ट केलं आहे.

आतिक शेख या तरुणाने जगदीश मुळीक यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लावले होते. या पोस्टरवरुन विरोधकांनी जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादीने भाजपला चांगलंच सुनावलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी मुळीकांवर या बॅनरवरुन टीका केली होती. "10 दिवसांचे सुतक तर संपू द्या, मग लावा बॅनर, का तुम्ही वाटच बघत होतात? आणि म्हणता आम्ही इतर पक्षांपेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळेपणा... बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजून वाहत आहेत. तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार.." असं त्यांनी ट्वीट केलं होतं. ते ट्वीट मुळीकांच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसत आहेत. त्यांनीदेखील ट्वीट करत टीका केली आहे. 

जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये काय लिहिलंय?

जगदीश मुळीक यांनी ट्वीट करुन आव्हाडांवर पलटवार केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख थेट औरंगजेब म्हणून केला आहे. 'बरं झालं मुंब्र्याच्या औरंग्यानं गरळ ओकली. या हिंदुद्वेष्ट्याकडून संस्कार शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. फेकन्यूजवर पोसलेल्या या माणसानं फोटोची साधी खातरजमा करायचे कष्ट घेतले नाहीत! प्रसिद्धीसाठी देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही बनणाऱ्या जितुद्दीनला आता जनतेनं पुरतं ओळखलं आहे.", असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

त्यासोबतच मुळीक यांनी वाढदिवसांसंदर्भात कार्यकर्त्यांना निवेदन केलेल्या बॅनरचा फोटोदेखील जोडला आहे. त्यात माझ्या वाढदिवसादिनी अर्थात 1 एप्रिल रोजी दरवर्षी आपण मला भरभरून शुभेच्छा देता, विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करता आपल्या या सदिच्छा मला आजवर निश्चितच पाठबळ देत आल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद... लोकनेते स्व. गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे 1 एप्रिल रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्वांनी याची नोंद घ्यावी. वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम रद्द करण्यात आले आहेत, असं विनेदनामध्ये जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Embed widget