(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uday Samant: पुण्यात मेट्रो लोकार्पण कार्यक्रमावेळी उद्योगमंत्र्यांचा मोबाईल हरवला अन्...; उदय सामंतांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Uday Samant: उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आज पुण्यातील कार्यक्रमादरम्यान मोबाईल हरवला म्हणजेच गहाळ झाल्याची घटना घडली. सामंतांनी सांगितलं नेमकं काय घडलं.
पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्गाचं पंतप्रदान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्यात उपस्थित होते, त्याचबरोबर या कार्यक्रमाला इतर मंत्री आणि नेते उपस्थित होते, यावळी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा आज पुण्यातील कार्यक्रमादरम्यान मोबाईल हरवला म्हणजेच गहाळ झाल्याची घटना घडली.
उदय सामंत यांचा आज पुण्यातील कार्यक्रमादरम्यान मोबाईल हरवला म्हणजेच गहाळ झाला. मात्र, काही वेळाने तो सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला उदय सामंत उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा फोन हरवला आहे, कोणाला सापडला असल्यास त्याने आणून द्यावा असं जाहीर करण्यात आलं. यानंतर काही वेळातच सामंत (Uday Samant) यांना त्यांचा फोन मिळाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेला उदय सामंत यांनी स्वतः देखील दुजोरा दिला असून मोबाईल सापडला असल्याची माहिती सुद्धा दिली आहे.
पुण्यातील भूमिगत मेट्रोला मोदींनी हिरवा झेंडा दाखवत केलं लोकार्पण!
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. आज संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट अशी 4 मेट्रो स्थानके आहेत.