Indapur Murder Case : इंदापूर गोळीबार प्रकरण: पंढरीला निघाले, वाटेत जेवायला थांबले, दोस्तच हत्येच्या कटात सामील; पोलिसांनी सांगितला A टू Z घटनाक्रम!
इंदापूर (Indapur) शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या सगळ्यात दोस्त सहभागी असल्याचं समोर आलं आहे.
इंदापूर, पुणे : इंदापूर (Indapur) शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये (Hotel Jagdamba) आज (दि.16) रात्री ही घटना घडली. याच घटनेतील खून करण्यात आलेला अविनाश धनवे हा मोक्कामधील आरोपी असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. तो एक महिन्यापूर्वी जेलमधून सुटून आला होता. सोबत जेवायला बसलेल्या साथीदारानंंच घात केल्याची माहिती आहे. असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. त्यासोबतच त्यांनी या घटनेचा घटकाक्रमही सांगितला आहे.
साथीदारानंच केला घात
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे हा मोक्क्यामधील आरोपी होता. तो एक महिन्या पूर्वी जेल मधून सुटून आला. पंढरपूरला जात असताना एका हॉटेलमध्ये तो थांबला असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करुन धनवेची हत्या करण्यात आली. महत्वाचं म्हणजे त्याच्या सोबत असणारा जेवण करणारा पण सहकारी या कटात सहभागी असल्याची माहिती आहे. या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्याकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपी सहभागी असल्याचं निष्पन्न झालं आहे. या सगळ्या आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. धनवेचे काही अवैध धंदे होते का? किंवा ही हत्या कशातून झाली? याचा तपास सध्या सुरु आहे.10 आरोपी हे विविध गुन्ह्यांमध्येदेखील सहभागी असल्याचं पुढे आलं आहे. त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे आहेत याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. या आरोपींना कठोर शिक्षा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
CCTV व्हायरल
विनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. या सर्व घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#Maharashtra #Pune #Indapur #GangWar
— Mayuresh Ganapatye (@mayuganapatye) March 17, 2024
CCTV footage brutal murder case from the Indapur in Pune district. pic.twitter.com/EAhKnfIpuI
इतर महत्वाची बातमी-