Pune Crime News : पोरांची शिक्षा पालकांना! तोडफोड, जाळपोळ करणाऱ्या आरोपींच्या पालकांवर गुन्हे दाखल होणार
वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यावर ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे : पुण्यात गुन्हेगारीने शिखर गाठलं आहे. त्यात कोयता गॅंगची दहशत (Pune Crime news) आणि वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यावर ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वाहनांची तोडफोड करणारे आरोपी हे अल्पवयीन असल्याचं दिसून आलं त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांची धिंडदेखील काढण्यात येणार आहे.
यात वाहन तोडफोड प्रकरणाचा पहिला अध्याय पाहायला मिळाला आहे. चंदनगर पोलिसांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्या गुन्हेगाराची परिसरात धिंड काढण्यात आली. चंदन नगर परिसरात वाहनांची तोडफोट आणि जाळपोळ केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी धीरज दिलीप सपाटे याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याची चंदननगर परिसरात धिंड काढण्यात आली. सपाटे आणि त्याच्या साथीदारांनी खराडी परिसरात महिन्याभरापुर्वी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, धीरज सपाटे हा गेल्या महिन्याभरापासून फरार होता. त्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची परिसरातून धिंड काढण्यात आली.
या जाळपोळ आणि वाहन तोडफोडी प्रकरणात अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी ठोस पावलं उचलायचा सुरुवात केली आहे. सुरुवातील कोणत्या परिसरात अशा घटना घडतात, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यासोबतच ज्या मुलांनी हे वाहन तोडफोड केल्या आहेत. त्यामुलांच्या पालकांतं समुपदेशन करण्यात येणार आहे. पालकांनी मुलांना कसे धडे द्यायचे किंवा शिवाय मुलांवर नियंत्रण कसं मिळवायचं, हे सगळं या पालकांना सांगण्यात येत आहे.
जाळपोळ अन् वाहनतोडफोड करणाऱ्या परिसरांवर करडी नजर
पुण्यात काही विशिष्ट भागात असे प्रकार घडत असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. या भागांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. परिसरात पेट्रोलिंग वाढवण्याच येणार आहे. साधारण तीन वर्षात हे सगळे प्रकार घडले आहेत. त्यात बघितलं तर हे सगळे गुन्हेगार किंवा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार नसून ते भुरटे असल्याचं समोर आलं.
इतर महत्वाची बातमी-