एक्स्प्लोर
पुण्यात फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या 50 दुचाकी जळून खाक

पुणे : कात्रजमध्ये एका फायनान्स कंपनीच्या गोडाऊनला आग लागून 50 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. कंपनीकडून जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचं हे गोडाऊन आहे. आज (रविवार) सायंकाळी 5 च्या सुमारास ही आग लागली. प्रचंड मोठ्या प्रमाणात भडकलेल्या या आगीत गोडाऊन शेजारील पावडर कोटिंगचे वर्कशॉप, गॅरेजचेही मोठे नुकसान झाले आहे. अग्नीशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र दुचाकी जळू खाक झाल्या. हफ्ते थकणे आणि इतर कारणांसाठी फायनान्स कंपनीने शहरातून 50 दुचाकी जप्त केल्या होत्या. या दुचाकी ज्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या, तिथे आग लागल्याने सर्व 50 दुचाकी जळून खाक. घटनास्थळी फुटलेल्या अवस्थेत सिलेंडर आढळून आला आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर फुटल्यानेच ही आग वाढली असावी, असा अंदाज लावला जात आहे.
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj






















