एक्स्प्लोर

IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा

आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे.

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे एकानंतर अनेक कारनामे समोर येत आहेत. आपल्या खासगी कारवर अंबर दिवा लावून थाट आणि अधिकारी पदाचा रुबाब केल्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र, पूजा खेडकर यांच्या आयएएस अधिकारी पदाच्या निवडीवरच आता अनेक शंका उपस्थित होत आहेत. कारण, अंपगत्वाचं (Disable) प्रमाणपत्र दाखवून त्यांनी ही सनदी अधिकारीपदाची नोकरी मिळवली, पण ज्या महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसपदाची पदवी मिळवली, त्या महाविद्यालयाकडे आपण शारिरीकदृष्ट्या फीट असल्याचं प्रमाणपत्र त्यांनीच दिलं असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यातच, आता पिंपरी चिंचवड (Pimpari chinchwad) महापालिकेतून त्यांना पायातील अपंगत्वाचंही प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे.  

आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे. येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून देखील त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं आहे. डाव्या गुडघ्यात 7 टक्केवारीने त्या कायमस्वरूपी आधु असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसतं, त्याअनुषंगाने त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र समोर आलेलं आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाबाबतही संशय आणि शंका वाढल्या आहेत. 

दरम्यान, पूजा खेडकर यांची पुणे जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सध्या अकोला येथे त्यांना प्रकल्प अधिकारी म्हणून नेमण्यात आलं असून 19 जुलैपर्यंत त्यांना तेथील कार्यभार देण्यात आला आहे. दुसरीकडे त्यांच्यावरील आरोपांसाठी केंद्र सरकारने 1 सदस्यीय समिती नेमली असून त्यांच्या युपीएससी परीक्षेतील निवडींसदर्भाने चौकशी केली जात आहे.

अधिष्ठाता यांचे म्हणणे

पूजा खेडकर यांनी ऑनलाइन पद्धतीने अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पूजा यांना बोलावून आम्ही तपासण्या केल्या, यात त्या 7 टक्के गुडघ्यात कायमस्वरूपी अधु असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार हे प्रमाणपत्र आम्ही दिलं. मात्र, त्यांना कमी दिसत होतं हे आमच्या तपासणीत आढळलं नाही, असे पिंपरी चिंचवड वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांनी म्हटलं आहे. 

एमबीबीएसला प्रवेश घेताना फीट

पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात 2007 मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. त्यावेळी सीईटीद्वारे तिला प्रवेश मिळाला होता. तिथे प्रवेश घेताना आपण पूर्णतः फीट असल्याचं, तसेच कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील त्यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेत नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं होतं. त्यांचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे, अशी माहिती समोर आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Clarification :  निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्बMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Embed widget