मनोरमा खेडकरांना पोलिसांनी उचललं , ‘या’ तीन गोष्टी आल्या अंगलट; IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईच्या अटकेची 3 कारणे कोणती?
Manorama Khedkar Arrest : महाडच्या हिरकणवाडी येथील पार्वती हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मनोरमा खेडकरांना (Manorama Khedkar Arrest) त्यांचे तीन कारनामे अंगलट आले आहे.
![मनोरमा खेडकरांना पोलिसांनी उचललं , ‘या’ तीन गोष्टी आल्या अंगलट; IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईच्या अटकेची 3 कारणे कोणती? IAS Officer Pooja Khedkar Mother Manorama Khedkar Arrested By Pune Paud Police know the three reason Maharashtra Marathi News मनोरमा खेडकरांना पोलिसांनी उचललं , ‘या’ तीन गोष्टी आल्या अंगलट; IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईच्या अटकेची 3 कारणे कोणती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/18/030a4df05582d44ddea03b861a51e230172128723542289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आईला अटक करण्यात आली आहे.महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Gramin Police) अटक केली आहे.शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. महाडच्या हिरकणवाडी येथील पार्वती हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मनोरमा खेडकरांना (Manorama Khedkar Arrest) त्यांचे तीन कारनामे अंगलट आले आहे. ते तीन कारनामे कोणते आहेत हे जाणून घेऊया.
मनोरमा खेडकरांचे 'हे' तीन कारनामे अंगलट
चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत
मनोरमा खेडकरांनी पोलिसांशी हुज्जत घातली. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच्या अंबर दिवा लावलेल्या खासगी गाडीची चौकशी करायला पोलीस गेले असता मनोरमा खेडकरांनी पोलिसांशी हुज्जत घातली.
मुळशीत शेतकऱ्यांना पिस्तुल काढून धमकावले
त्यानंतर मनोरमा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आला. मनोरमा खेडकरांनी मुळशी तालुक्यात आपल्या जमिनीशेजारील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पिस्तुल हाती घेत तिने ग्रामस्थांना धमकावलं. पुणे (Pune) जिल्ह्यातील मुळशी (Mulashi) तालुक्यातील धडवली गावात स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली. मात्र जेवढी जमीन खरेदी करण्यात आली त्यापेक्षा जास्त जमिनीवर खेडकर कुटुंबाने दावा करायला सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी याला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर (Pooja Khedkar) यांची आई मनोरमा खेडकर यांनी चक्क पिस्तूल काढून या शेतकऱ्यांना धमकावलं.
2022 साली पुणे पोलिसांशी अरेरावी
बाणेर बंगल्याबाहेर मेट्रोच्या कामात मनोरमा खेडकरांनी अडथळा आणल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यातही त्या पोलिसांशी अरेरावी करताना दिसल्या. 2022 मधील ही घटना असून पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केलीय. खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोच काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्यासमोरील फुटपाथवर ठेवले होते. त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यां सोबत वाद सुरू केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील कर्मचारी तिथे पोहचले. मात्र मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला.
Watch Video : IAS Pooja Khedkar यांची आई मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसात आणलं
हे ही वाचा:
Manorama Khedkar Arrest : महाडच्या हॉटेलमधून उचललं, पुण्यातील पौड पोलिसात आणलं, मनोरमा खेडकरवर काय कारवाई होणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)