एक्स्प्लोर

Manorama Khedkar Arrest : महाडच्या हॉटेलमधून उचललं, पुण्यातील पौड पोलिसात आणलं, मनोरमा खेडकरवर काय कारवाई होणार?

Manorama Khedkar Arrest : पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

वादग्रस्त पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkarआई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. मनोरमा खेडकरसह पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक पौड पोलिस ठाण्यात दाखल झालं आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे.

मनोरमा खेडकरची आज वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) ससून रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येत आहे. त्यानंतर आज तिला कोर्टात देखील हजर केलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलिस पुढचा तपास सुरू करतील अशी माहिती आहे.  धमकी प्रकरणतील सखोल चौकशी केली जाईल. मनोरमा खेडकरला आज महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला आणण्यात आलं आहे. मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मनोरमा खेडकरला आज कोर्टात हजर केलं जाणार

मनोरमा खेडकरची (Manorama Khedkar) वैद्यकीय तपासमी झाल्यानंतर तिला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस तिच्या पोलिस कोठडीची मागणी करतील. त्याचबरोबर पुणे पोलिस दिलीप खेडकरांचा देखील शोध घेत आहेत त्यांच्याबाबतची माहिती मनोरमा खेडकरला माहिती आहे का यासोबतच खरेदी केलेली जमीन आणि इतर तपासासाठी पोलिस तिच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. 

मुळशीतील व्हायरल व्हिडीओनंतर  पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल

शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमाविरुद्ध (Manorama Khedkar) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोनही लागत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी शोध घेतला होता.

मनोरमा खेडकरचा (Manorama Khedkar) दुसरा एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ती पोलिसांची हुज्जत घालत असताना दिसली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस मनोरमाच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यामध्ये पोहोचले होते. पण, मनोरमाने पोलिसांना बंगल्यामध्ये प्रवेश दिला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा फरार झाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी तिला आज महाडमधून अटक केली असून तिला पुण्यामध्ये आणले जात आहे. आज तिला कोर्टामध्ये हजर केले जाईल.

VIDEO - IAS Pooja Khedkar यांची आई मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसात आणलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget