एक्स्प्लोर

Someshwar Temple In Pune: श्रावण सोमवार विशेष: 900 वर्ष जुन्या सोमेश्वर मंदिरात जिजाऊंनी देखील केली होती शिवरायांसाठी प्रार्थना

राजमाता जिजामाता 1640 ते 1650 च्या दरम्यान प्रार्थना करण्यासाठी येत असत असे म्हणतात. लहानपणी शिवाजी देखील आपल्या आईसोबत प्रार्थना करण्यासाठी जायचे त्यामुळे या गावाला पेठ जिजापूर असेही म्हणतात.

Someshwar Temple In Pune: पुण्यातील सोमेश्वर महादेव मंदिर काळ्या पाषाणात हेमाडपंती पद्धतीने बांधलेले आहे. हे मंदिर सुमारे 900 वर्षे जुनं असल्याचं मानलं जातं. सोमेश्वर वाडीजवळ रामनदीच्या काठी वसलेलं आहे. नदीजवळ चक्र तीर्थदेखील आहे. दक्षिणेकडे नदीच्या किनार्‍याजवळ देवी पद्मावतीचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात मोठ्या संख्येन भाविक दर्शनासाठी येतात.

मंदिर परिसर कसा आहे?
हे मंदिर साडेतीन एकर जागेवर पसरलेले असून त्याला तीन प्रवेशद्वार आहेत. मुख्य सोमेश्वर वाडीपासून आहे. दुसरं रामनदीकडे उघडणारे  आणि एक मंदिराच्या पश्चिमेला आहे. आतील गाभाऱ्यातून स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन होतं. गर्भगृहाच्या वरच्या घुमटावर सुंदर नक्षीकाम आहे. या मंदिरात 40 फूट उंचीची दीपमाळ आहे. गणेश, हनुमान आणि भैरवनाथाच्या मंदिरांनी वेढलेले आहे. मंदिराच्या उत्तरेस हवन कुंड आहे. गाभार्‍यात प्रवेश करण्‍यासाठी आणि अभिषेक करण्‍यासाठी पारंपारिक कपडे परिधान करावे लागतात. पुरुषांना सलवार कुर्ता किंवा धोती तर महिलांना साडी नेसावी लागते. या मंदिरात मंदिराचा इतिहास सांगणारे एक संग्रहालय देखील आहे. त्यात मोडी लिपीतील जुनी अक्षरे तसेच जुनी छायाचित्रे आहेत. श्रावणातील प्रत्येक सोमवारी, साबुदाणा खिचडी दिवसभर प्रत्येक भाविकाला महाप्रसाद म्हणून दिली जाते.   

मंदिराचा इतिहास:
इ.स. 950 मध्ये, यादव काळात आणि 1935 मध्ये राजा आदित्य वर्मनच्या कारकिर्दीत  या मंदिराचा इतिहासात उल्लेख आढळतो.  हे एक जागृत ठिकाण आहे जिथे राजमाता जिजामाता 1640 ते 1650 च्या दरम्यान प्रार्थना करण्यासाठी येत असत असे म्हणतात. लहानपणी शिवाजी देखील आपल्या आईसोबत प्रार्थना करण्यासाठी जायचे त्यामुळे या गावाला पेठ जिजापूर असेही म्हणतात. शिवाजीच्या दरबारातील मंत्री हनुमंते यांची समाधीही येथे आहे.

पेशव्यांच्या काळात शिवराम भट चित्र स्वामी यांनी त्यांच्याकडे सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांसह जीर्णोद्धारासाठी हातभार लावला आणि नंतर नानासाहेब पेशव्यांना दिला. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात नानासाहेब पेशवे यांचा मोलाचा वाटा होता. चित्रवस्‍वामींची समाधीही मंदिरात आहे. 1974 ते 1984 मध्ये भाविक आणि रहिवाशांनी नूतनीकरण केले. या मंदिराचा जीर्णोद्धार 2012 मध्ये विशेषतः राजस्थानमधून आणलेल्या संगमरवरी थर असलेल्या जुन्या दगडाचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget