एक्स्प्लोर
गुटखा किंग रसिकलाल धारिवाल यांचं निधन
माणिकचंद ब्रँडचे (गुटखा) संस्थापक आणि शिरुरचे माजी नगराध्यक्ष रसिकशेठ धारीवाल यांचे आज प्रदीर्घ आजाराने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे निधन झाले.
पुणे : माणिकचंद ब्रँडचे (गुटखा) संस्थापक आणि शिरुरचे माजी नगराध्यक्ष रसिकशेठ धारीवाल यांचे आज प्रदीर्घ आजाराने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
धरिवाल यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारामुळे धारिवाल यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं रुबी हॉल रुग्णालयानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र, ते कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज त्यांचे निधन झाले.
सुरूवातीला ते तंबाखूचे व्यापारी म्हणून ओळखले जात होते. नंतर गुटखा उद्योजक म्हणून ते नावारुपास आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement