एक्स्प्लोर

मोठी बातमी: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यात आजाराची लागण, सोलापूरला जाऊन जीव सोडला

Guillain Barre Syndrome: पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता.

पुणे: पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, तर एक चिंता वाढवणारी बातमी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) रुग्णांच्या संख्येत शनिवारी (ता. 24) वाढ झाली नाही. रुग्णसंख्या 73 वर स्थिर आहे, तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. दरम्यान, शनिवारी नऊ संशयित रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी (ता. 25) मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रूग्ण हा डीएसके विश्व धायरी परिसरात राहण्यास होता. त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रूग्ण सनदी लेखापाल (सीए) असून, एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व भाऊ, असा परिवार आहे. त्यांना 11 जानेवारी रोजी पुण्यात जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. काही कार्यक्रमानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेले होते. 

सोलापुरात गेल्यानंतर अशक्तपणा जास्त प्रमाणात वाढला. त्यामुळे त्यांना सोलापूरमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची अवस्था पाहून डॉक्टरांनी 'जीबीएस' (Guillain Barre Syndrome) झाल्याचे निदान केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची तब्येत स्थिर होती. पण त्यांना हातपाय हलवता येत नव्हते. गेले पाच दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने शनिवारी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर हलवण्यात आलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नातेवाइकांनी दिली आहे.  तर दुसरीकडे रुग्णालयातील डॉक्टरांनी, "मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजू शकलेले नाही. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन केले जाणार आहे", अशी माहिती दिली आहे.

काय काळजी घ्यावी

पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?

दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कारGadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special ReportABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Astrology : आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
आज प्रजासत्ताकदिनी बनले मोठे शुभ योग; 3 राशींना होणार याचा मोठा लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी
Embed widget