Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 73 वर; दूषित पाण्यातूनच पसरतो जीवाणू, पाणी उकळून पिणे हाच उपाय
Guillain Barre Syndrome: एनआयव्हीच्या अहवालातून या आजाराबाबतचे मूळ कारण निष्पन्न झाले असून, दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याने रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे: पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरातील गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) एकूण 73 रुग्ण सापडले आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) एकूण रूग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 47 पुरुष तर 26 महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक 44 रुग्ण आहेत. 9 वर्षापर्यंत असलेले 13 रुग्ण तर 60 ते 69 वयोगटातील 15 रुग्ण आहेत. एनआयव्हीच्या अहवालातून या आजाराबाबतचे मूळ कारण निष्पन्न झाले असून, दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याने रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) झालेल्या रुग्णांच्या नमुन्यात 'कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी' हे जिवाणू (बॅक्टेरिया) आढळून आलेले आहेत. हे जिवाणू दूषित पाण्यातून पसरतात. तसेच या जिवाणूमुळेच सिंहगड रस्ता परिसरात 'जीबीएस'चे रुग्ण वाढल्याची दाट शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्यात निर्जंतुक करणारे मिश्रण वापरण्याऐवजी पाणी उकळून व गार करून प्यावे, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
पाणी उकळून प्या
पाणी उकळल्याने त्यामधील अतिसारसाठी कारणीभूत ठरणारे जिवाणू जसे 'कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी', 'इ - कोलाय' एका मिनिटांत नाहीसे होतात. जर पाणी महापालिकेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या ठिकाणावरून येत असेल तरी देखील ते उकळून आणि गाळून प्यावे. पावसाने गढूळ झालेले असेल तर असे पाणी प्रथम उकळून घ्यावे व गाळून घ्यावे. त्यानंतर ते पिण्यास योग्य होते. तसेच क्लोरीनचाही वापर करता येऊ शकतो. पाणी उकळून पिणे शक्य नसल्यास द्रव स्वरूपातील क्लोरीनचे तीन थेंब दोन लिटर पाण्यासाठी पुरेसे असतात. पाण्यानुसार प्रमाण वाढवावे. तसेच हे थेंब टाकल्यानंतर पाच मिनिटे ते पाणी तसेच ठेवून मग प्यावे, असंही तज्ज्ञ सांगतात. (Guillain Barre Syndrome)
पाणी गढूळ असल्यास काय करावे?
पाणी महापालिकेच्या व्यतिरिक्त इतर स्त्रोताचे असेल तर त्याचा स्त्रोत योग्य हवा. पावसामुळे पाणी गढूळ झालेले असेल तर असे पाणी प्रथम उकळून घ्यावे व गाळून घ्यावे. त्यानंतर ते पिण्यास योग्य होते. तसेच क्लोरीनचाही वापर करता येऊ शकतो. प्रवास करताना शक्यतो घरातील उकळलेले पाणी सोबत घ्यावे. ते शक्य नसल्यास मिनरलयुक्त पाण्याची बाटली घ्यावी आणि ते पाणी प्यावे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )