Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणेश मंडळाचा उच्छाद, पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे अन् फटाके फोडले, 26 तास उलटूनही विसर्जन मिरवणुका सुरुच
Pune Ganesh Visarjan: पुण्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत 163 गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान 60-70 मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. मिरवणूक संपायला 2-3 वाजण्याची शक्यता आहे.

पुणे: पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला 26 तास उलटूनही मात्र अजुनही मोठ्या प्रमाणात गणपती मंडळांच्या विसर्जन (Pune Ganesh Visarjan)मिरवणूका सुरु आहेत. काल साडेनऊ वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली होती. पाच मानाच्या गणपतींचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन वेळेत झाले. मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळली. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजून ही सुरूच आहे, मिरवणुकीला काल सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाल्यानंतर आत्ताही मिरवणुका सुरूच आहेत. नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली आहे, पोलिस मिरवणुका (Pune Ganesh Visarjan) आवरण्याचे आवाहन करत आहेत. पुण्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत 163 गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत. अजून किमान 60-70 मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत. मिरवणूक संपायला 2-3 वाजण्याची शक्यता आहे. (Pune Ganesh Visarjan)
पुण्यात नियमांचे उल्लंघन; गणेश मंडळावर कारवाई
गणेश विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांवर स्पष्ट बंदी असतानाही राष्ट्रभूषण गणपती मंडळाने अलका टॉकिज चौकात थांबून जोरदार आतषबाजी केली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. सुदैवाने कोणतीही जखमी किंवा मोठे नुकसान झालेले नाही. मात्र, नियमांचे उल्लंघन करून मंडळाकडून फटाके फोडण्यात आले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाक्यांवर पोलीस आणि प्रशासनाकडून पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तरीही मंडळाने थेट बंदी झुगारून उच्छाद मांडल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कारवाई केली असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अलका टॉकीज चौकात चौफेर पोलीस पण मंडळांचा अच्छाद संपत नसल्याचे चित्र आहे. दगडी नागोबा गणेश मंडळाकडून भर चौकात फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली आहे.
मानाच्या गणपतींचे विसर्जन कधी झाले?
मानाचा पहिला कसबा गणपती
-3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती
-4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम-
4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
-4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
-5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं.
-तर दगडू शेठ हलवाई गणपती मिरवणूक सायंकाळी 4 वाजता सुरू झाली..विसर्जन 9 वाजून 23 मिनिटांनी म्हणजेच 5 तास 23 मिनिटांनी झाले.भाऊ रंगारी गणपती 3 वाजून 21 मिनिटांनी अलका चौकात पोहचला त्यानंतर त्याचे विसर्जन झाले.
अलका टॉकीज चौकात चौफेर पोलीस पण मंडळांचा अच्छाद संपेना; राष्ट्रभूषण क्रीडा संघ मंडळासह दगडी नागोबा गणेश मंडळाकडून भर चौकात फटाक्यांची अतिशबाजी#Punenews #Ganpativisarjan2025 #puneganeshvisarjan pic.twitter.com/Sd70S3hiHE
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 7, 2025
























