Baramati News : बारामती राज्य उत्पादन शुल्कच्या पथकावर गुन्हा दाखल करा अन्यथा आत्मदहन करेल; गरोदर महिलेचा पोलिसांना इशारा
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकावर गुन्हा दाखल करा, अन्यथा आत्मदहन करेल असा इशारा गरोदर महिलेने माळेगाव पोलिसांना दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने येऊन रात्री मारहाण केली.
बारामती, पुणे : राज्य उत्पादन शुल्कच्या पथकावर (Baramati News) गुन्हा दाखल करा अन्यथा आत्मदहन करेल असा इशारा गरोदर महिलेने माळेगाव पोलिसांना दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने येऊन रात्री मारहाण केली. मी गरोदर असताना देखील माझ्या पोटात मारले, आईचे कपडे फाडले तसेच माझ्या भावाला मारहाण केल्याचा आरोप बारामती तालुक्यातील माळेगाव येथील महिलेने केला आहे. गुरुवारी रात्री राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने येऊन आम्हाला मारहाण केली. दगड फेक केली आणि माळेगाव पोलीस ठाण्यात जाऊन आमच्या वरतीच गुन्हा दाखल केला. परंतु माळेगाव पोलिसांना आम्ही तक्रार करून देखील पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे महिलेचे म्हणणं आहे. जर गुन्हा नोंद नाही केला तर आत्मदहन करू, असा इशारा महिलेने दिला आहे.
राज्य उत्पादन शुल्काचे पथक बारामती तालुक्यातील माळेगाव येथील विक्रम नगर येथे कारवाईसाठी गेले असता त्यांच्या वरती जमावांना हल्ला केला अशा आशयाची तक्रार राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून 10 जणांवर गुन्हा नोंद केला. परंतु आम्ही त्यांना मारहाण केली नाही तर त्यांनीच आम्हाला मारहाण केली असल्याचा आरोप महिलेने केला आहे. म्हणून राज्य उत्पादन शुल्कच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.पोलीस गुन्हा नोंद करत नाही, म्हणून बारामती नीरा काल रस्ता काही काळ अडवून धरला होता.
नेमकी कशाची कारवाई केली?
पीडित कुटुंबियांनी उत्पादन शुल्क विभागावर आरोप केले आहे. आमच्याकडे नेमकी कोणती कारवाई करण्यासाठी पथक आलं होतं. हे त्या पथकाने सांगावं आणि घरात नेमकं काय काय दस्तावेज सापडला हेदेखील त्यांनी सांगावं, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून हल्ल्याची तक्रार
बारामती तालुक्यात कारवाई करण्यासाठी (Baramati News) गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला होता. 23 नोव्हेंबर रोजी 6 जणांच्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला होता. संदर्भात बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. राज्य उत्पादन शुल्क यांचे पथक बारामती तालुक्यातील माळेगाव गावचे हद्दीत विक्रमनगर येथे कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावर जमावाने पथकाला हातातील काठीने व दगडाने मारहान करुन शिवीगाळी केली होती. तसेच शासकीय व खाजगी वाहनांना दगड मारुन काचाफोडून नुकसान केले यावरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र आता आरोपींनीच उत्पादन शुल्क विभागाने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. बहिण गरोदर असून तिला मारहाण केल्याचं गरोदर महिलेच्या भावाने सांगितलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune FDA News : अन्न व औषध प्रशासनाची पुण्यात धडक कारवाई; साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त