एक्स्प्लोर
डीएसकेच्या आलिशान 13 गाड्यांचा लिलाव होणार
डीएस कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पुणे : गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी डीएसकेंच्या तेरा गाड्यांचा लिलाव करण्याचे आदेश प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या सर्व आलिशान गाड्या असून यामध्ये 78 लाखांची पॉर्श, 85 लाखांची बीएमडब्ल्यू आणि पाच इनोव्हा गाड्यांचा समावेश आहे. बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी गुंतवणूकदारांची कोट्यावधींसाठी फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके दाम्पत्य तुरूंगात आहेत.
DSK | डीएसकेंची मालमत्ता विक्रीला काढा पुणे कोर्टाचे आदेश, मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे फेडण्याचा विचार
डीएस कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या ते कारागृहात आहेत. पोलिसांनी डीएस कुलकर्णी यांच्या अनेक मालमत्ता तसेच वीस आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. सध्या यातील तेरा आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. या गाड्यांची किंमत 2 कोटी 86 लाख रुपये इतकी आहे. शनिवारी (15 फेब्रुवारी) या गाड्यांचा लिलाव होणार आहे.
या 13 गाड्यांचा लिलाव होणार :
पॉर्श - 78 लाख 10 हजार
बीएमडब्ल्यू- 85 लाख 70 हजार
ऑगस्टा- 26 लाख 64 हजार
बीएमडब्ल्यू - 41 लाख
कॅमरे हायब्रीड- 16 लाख 87 हजार
सॅन्ट्रो- 1 लाख 20 हजार
क्वॉलिस- 2 लाख 50 हजार
इटिऑस- 4 लाख 30 हजार
इनोव्हा- 8 लाख 47 हजार
इनोव्हा - 4 लाख 50 हजार
इनोव्हा- 6 लाख 18 हजार
इनोव्हा- 3 लाख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
Advertisement