एक्स्प्लोर
म्हणून धोनीची रायझिंग पुणेच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला आयपीएल टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आहे. युवा नेतृत्वाकडे कप्तानपदाची धुरा सोपवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं टीमचे मालक संजीव गोयंका यांनी सांगितलं आहे.
'धोनी हा निश्चितच चांगला कर्णधार आहे. मात्र आयपीएलच्या येत्या सिझनमध्ये स्मिथ आमचा कर्णधार असेल. पूर्ण संघ तरुण आणि फीट असावा, यासाठी आमचे प्रयत्न असतील. म्हणूनच एका युवा क्रिकेटपटूला संघाचं नेतृत्व देत आहोत. माहीने आमच्या निर्णयाचं स्वागतच केलं आहे.' असं रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी 'आज तक'ला सांगितलं आहे.
https://twitter.com/BoriaMajumdar/status/833231473121439745
धोनीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथकडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. धोनीने आयपीएलच्या नवव्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं कर्णधारपद भुषवलं होतं. यापूर्वी स्मिथने राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे, तर धोनीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा होती. मात्र दोन्ही संघांवर मॅच फिक्सिंग प्रकरणात बंदी घालण्यात आली आहे.
आयपीएलच्या नवव्या मोसमात धोनीच्या नेतृत्वात पुणे सुपरजायंट्सने निराशाजनक कामगिरी केली होती. एकूण 17 सामन्यांपैकी पुणे सुपरजायंट्सने केवळ पाच सामन्यात विजय मिळवला होता. त्याने आयपीएल-9 मध्ये 12 इनिंगमध्ये केवळ 284 धावा केल्या होत्या. यामध्ये एका अर्धशतकी खेळीचा समावेश होता.
13 वर्षांत पहिल्यांदाच उचलबांगडी
13 वर्षांच्या कारकीर्दीत धोनीची पहिल्यांदाच उचलबांगडी करण्यात आली आहे. 2014 मध्ये कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय धोनीनेच घेतला होता. तर 2017 च्या सुरुवातीला वनडे कप्तानपदावरुन पायउतार होण्याचंही धोनीनेच ठरवलं होतं.
आयपीएल 2017 चा पहिला सामना 5 एप्रिलला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना याच मैदानात 21 मे रोजी होणार आहे. गतविजेते सनरायझर्स हैदराबाद आणि त्याचवर्षीचे उपविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात हा सामना खेळवला जाईल.
47 दिवसांची टूर्नामेंट
आयपीएल 2017 देशभरातील दहा स्टेडियम्सवर 47 दिवस खेळवली जाणार आहे. प्रत्येक टीम 14 सामने खेळेल. त्यापैकी सात सामने घरच्या मैदानावर रंगतील. 2011 नंतर पहिल्यांदाच इंदौरमध्ये आयपीएलचा सामना रंगणार आहे.
संबंधित बातम्या :
मोहम्मद कैफ गुजरात लायन्सचा सहप्रशिक्षक
आयपीएल 2017 : धोनीला पुणे सुपरजायंट्सच्या कर्णधारपदावरुन हटवलं!
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement