एक्स्प्लोर

भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आरोप

भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्त्वाचं खच्चीकरण करण्याचं एक सुनियोजित कारस्थान चालल्याचं निदर्शनास येत असल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी केला आहे.

पुणे : भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे. ब्राह्मण असल्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "आधी नितीन गडकरी यांना पतंप्रधानपदाच्या शर्यतीतून हटवलं आणि आता देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने उपमुख्यमंत्रीपद देत खच्चीकरण केलं. भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्त्वाचं खच्चीकरण करण्याचं एक सुनियोजित कारस्थान चालल्याचं निदर्शनास येत आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करत आहे," असं अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी म्हणाले.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीमधून हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचं चारित्र्यहननाच्या माध्यमातून खच्चीकरण केलं. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडदौड अडवण्यासाठी, आमदारांची जास्त संख्या असूनही सरकार न बनवण्याचं षडयंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आलं. आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे  निर्देश दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करुन कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं ठरवलं. त्यानंतरही भाजपातील वरिष्ठ नेतृत्त्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरुन देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आलं आहे, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणाले. 

परशुराम सेवा संघाचा आक्षेप
मात्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या या आरोपाला भाजपशी संलग्न असलेल्या परशुराम सेवा संघाने आक्षेप घेतला आहे. भाजपमध्ये ब्राह्मण समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जातो आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद न मिळण्याला जातीय रंग देऊ नये, असं या संघटनेचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार फडणवीसांकडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणात 30 जून हा दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला होता. एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळत होते. चर्चा अशी होती की, भाजप-शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. मात्र स्वत: फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. मात्र शपथविधीच्या काही वेळ आधीच भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशानुसार आपण ही शपथ घेतली असल्याचं ट्वीट देखील फडणवीसांनी केलं. 

देवेंद्र फडणवीस नाराज?
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील राजकीय उलटफेरीत 'चाणक्य' अशी प्रतिमा निर्माण झाली. मात्र भाजप (BJP) हायकमांडकडून ऐनवेळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यांनी शपथ देखील घेतली. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते (Rebel Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली. शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड होणं ही जितकी आश्चर्याची गोष्ट होती तितकीच आश्चर्याची गोष्ट होती उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेणं...फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून देखील ते नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं. शरद पवार यांनी देखील यावर भाष्य केलं.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget