Devendra Fadnavis : रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सूचित! अजित पवारांच्या पुढाकाराचा परिणाम, फडणवीसांकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक
Namo Rojgar Melava, Baramati News : रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सूचित करण्यात आली. पण, अर्ज कमी प्राप्त झाले आहेत. आणखी अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis Speech : आज बारामतीमध्ये (Baramati) भव्य नमो रोजगार महामेळाव्यात (Namo Rojgar Melava) रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सूचित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. रोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी अजित पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अजित पवारांच्या पुढाकाराने रोजगार मेळावा यशस्वी झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
उद्योगांना बोलवून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न
नमो रोजगार मेळावा उद्योगांना इथे बोलवून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. नमो रोजगार मेळाव्याचे जेव्हापासून बारामतीत आयोजन करण्यात आले तेव्हापासून माध्यमांतून या मेळाव्यास मोठी प्रसिद्धी मिळाली, त्यासाठी माध्यमांचे आभार. त्यांच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी मिळाली. राजकारणात काम करणारे आम्ही कंत्राटी कामगार आहोत, आमचं कंत्राट पाच वर्षाने रिन्यू होतं. चांगलं काम केलं तर, आपण वर-वरच जाऊ, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सूचित
फडवीसांनी पुढे सांगितलं की, या मेळाव्यात 55 हजार पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनांची आवश्यकता आहे. एकीकडे रोजगार आणि दुसरीकडे रोजगार देणार आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केले. यामुळे हा रोजगार मेळावा पार पडत आहे. रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सूचित करण्यात आली. पण, अर्ज कमी प्राप्त झाले आहेत. उद्या आणखी अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
तरुणांना शिक्षण आणि कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल
जे-जे येथे आले आहेत, त्यांना त्यांचे शिक्षण आणि कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमाकावर आणली आणि आपण लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ
बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या इमारती
नमो रोजगार मेळाव्यात संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केलेत. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नागपूरमधे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्यात होत्या. या मेळाव्यासाठी 36 हजार अर्ज आहे आणि 55 हजार पदे आहेत. हे पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. तरुणांनी याचा लाभ घ्यावा. बारामतीचे बस स्थानक एअरपोर्टसारखे आहे तर पोलीस उपमुख्यालाय एखाद्या कॉर्पोरेट ऑफिससारखे. बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या या इमारती आहेत.'
फडणवीसांकडून अजित पवारांचं तोंड भरुन कौतुक
''तुम्ही लक्ष घालून एवढ्या चांगल्या इमारती बांधल्या, आता मला मोह होतोय की, आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, तिथे पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावं, म्हणजे सर्व इमारती चांगल्या होतील. अर्थात दादा मला म्हणू शकतात की, पीएमसी खातंच मला द्या पण, ते देणार नाही, ते माझ्याच कडे ठेवेन. पण, सगळ्या चांगल्या इमारती बांधण्यासाठी तुमची मदत मात्र नक्की घेईन, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.'', असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.