Pune Building Collapse : उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या निर्माणाधीन मॉलचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पावणेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.
माहितीनुसार काम सुरु असताना स्लॅबसाठी बनवलेली लोखंडी जाळी अचानक कोसळली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी तिथे दहा कामगार काम करत होते. यातील पाच कामगारांचा मृत्यू झालाय. तर दुर्घटनेतील इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय. रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली असून साईट वरती स्लॅब साठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि त्याखाली काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या साईटवर रात्री उशिरा देखील काम सुरूच होत घटना घडली तेव्हा एकूण 10 मजूर तिथं काम करत होते त्यातील पाच जण या घटनेत मृत्युमुखी पडले असून उर्वरीत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या साऱ्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल होतं, सध्या मृत्यूंची ओळख पटवण्याचा काम पोलिस प्रशासन करत असून जखमींना ससून रुग्णालयात नेले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या घटनेनंतर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत एवढ्या रात्री या साईटवर काम कसं काय चालू होतं? या मॉलच्या बांधकाम वेळेस सुरक्षतेची योग्य ती जबाबदारी घेतली आहे का? एवढ्या रात्री देखील काम सुरू करायला परमिशन नव्हती दिली कुणी? या साऱ्या प्रश्नांसह या कामगारांची जबाबदारी नेमकी कोण घेणार हे देखील महत्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: