चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला (Hindusthani Bhau Vikas Phatak) 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई : विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानाबाबत न्यायालयात बेशर्त माफी मागण्यात आल्याचं वकील अॅड. महेश मुळ्येंनी सांगितलं. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना काल सांगितलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.
आधीच्या व्हायरल व्हिडीओत काय म्हणालेला विकास फाटक
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
Hindustani Bhau Video: हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओनंतर दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक?
रुको जरा, सबर करो डायलॉगने प्रसिद्ध, कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha