एक्स्प्लोर
Advertisement
डीएसके दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय
न्यायालयाने दोन्ही बाजूंच म्हणन एकून घेतल्यानंतर जामिनाबाबत आपण उद्या निर्णय देऊ असं म्हटलं आहे. त्यामुळे आता डीएसकेंना जामिन मिळणार की नाही हे उद्याच स्पष्ट होईल.
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज (गुरुवार) पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी डीएसकेंच्या वकिलांनी पोलिसांनी साठ दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करण्याची मागणी केली. तर सरकारी वकिलांनी पोलिसांना त्यासाठी ९० दिवसांचा कालावधी मिळावा अशी मागणी केली.
डीएसके आणि त्यांच्या पत्नी यांनी विविध मार्गांनी आतापर्यंत तीन हजार कोटी रुपये जमा केल्याचे आणि त्यापैकी चोवीसशे कोटी रुपये इतरत्र वळवल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंच म्हणन एकून घेतल्यानंतर जामिनाबाबत आपण उद्या निर्णय देऊ असं म्हटलं आहे. त्यामुळे आता डीएसकेंना जामिन मिळणार की नाही हे उद्याच स्पष्ट होईल.
डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर पुण्याबरोबर मुंबई आणि कोल्हापूर मध्येही फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणूकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले.
मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणूकदारांची अडचण झाली आहे.
2014 पासून अनेकांनी घर बूक केलं. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.
स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.
सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली.
इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे.
अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले.
सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं.
मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी कोर्टाने आता डीएसकेंना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
संबंधित बातम्या
बँकेकडून डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव
डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, डॉक्टरांचा अहवाल
डीएसके पुन्हा ससूनमध्ये, चाचण्या सामान्य आढळल्यास कोठडीत रवानगी होणार
डीएसकेंच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर
डीएसकेंची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक
डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट
डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी
डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!
डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर
"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका
कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी
कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात
डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला
शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement