Datta Gade Swarget Bus Crime: दत्ता गाडे विरोधात सबळ पुरावे पोलिसांच्या हाती; डीएनए चाचणी होणार अन्..., रक्त, केसांची देखील होणार तपासणी
Datta Gade Swarget Bus Crime: दत्ता गाडेला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आलं, त्यावेळी येताना त्याची चौकशी सुरू केली होती. ससून रुग्णालयात त्याची पहिली वैद्यकीय तपासणी तसेच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली.

पुणे: पुण्यातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या नराधम आरोपी दत्तात्रेय गाडे याचा काल (शनिवारी) पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. तसेच त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. बस स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. 25) घडली होती. आरोपी गाडेने तरुणीकडे वाहक असल्याचं भासवत तरूणीला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगितलं. त्यानंतर तिच्या मागे जाऊन तिला अडवलं आणि तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती या घटनेनंतर समोर आली होती. मात्र, या घटनेनंतर अनेक धक्कादायक दावे केले जात आहेत. त्याचबरोबर हा अत्याचार नसून दोघांच्याही समंतीने संबंध प्रस्थापित झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे.
दरम्यान तरुणीवर अत्याचार करुन गाडे फरार झाला होता. शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याला स्थानिकांच्या मदतीने अटक केली आहे. गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. स्वारगेट आगारामध्ये थांबलेल्या तरुणीला ‘ताई’ म्हणत आरोपीने शिवशाही बसमध्ये नेऊन गळा दाबून अत्याचार केला. त्यानंतर ‘दादा मला घरी जाऊ द्या,’ अशी विनवणी तरुणी करत असतानाही आरोपीने तिला मारहाण करून दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादित नमूद आहे. दरम्यान या घटनेबाबत होत असलेल्या दाव्यांबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
रक्त आणि केसांची देखील होणार तपासणी
दत्ता गाडेला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आलं, त्यावेळी येताना त्याची चौकशी सुरू केली होती. ससून रुग्णालयात त्याची पहिली वैद्यकीय तपासणी तसेच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. लैंगिक क्षमता चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यानंतर आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. रक्त आणि केसांचे नमुने डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
बसची प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी पाहणी
स्वारगेट बसस्थानकात ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला, त्या बसची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.
आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी होणार
आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी होणार असल्याची माहिती आहे. आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. आरोपीविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. बसची फॉरेन्सिक चाचमी त्यात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली ती पण पॉझिटिव्ह आली आहे.























