एक्स्प्लोर

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुण्यात कोरोनाचा प्रसार?

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोठे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं होतं.

पुणे : एमपीएसची परीक्षा पुढे ढकल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण या आंदोलनावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. 

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोठे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं होतं. तब्बल आठ तास पुण्यातील प्रमुख असलेला लाल बहादूर शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवून ठेवला होता. त्यानंतर या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून पुणे पोलीस दलातील तब्बल पाच कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. यातील तिघे जण हे वरिष्ठ अधिकारी आहेत. आंदोलन संपल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता हे पाचही जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. 

MPSC Exam Postponed | पुण्यातील नवी पेठेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा रास्ता रोको, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक

एमपीएससीची पूर्व परीक्षा 21 मार्चला

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता एमपीएससीची पूर्व परीक्षा 21 मार्चला पार पडणार आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

सरकारने परवानगी दिली तर येत्या 100 दिवसात पुण्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करु; मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता

काल नेमकं काय घडलं होतं?

राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं होतं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. त्यानंतर पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने  पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले होतं. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Raksha Khadse: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात;  मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

India Vs New Zealand : Rohit Sharma चा भारतीय संघ मोठ्या रुबाबात उपांत्य फेरीतMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 03 March 2025 : ABP MajhaTop 100  Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : 03 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Raksha Khadse: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात;  मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
Pune Crime Swargate bus depot: काय करायचंय ते कर पण मला जिवंत सोड, तरुणी घाबरल्याने दत्तात्रय गाडेचा आत्मविश्वास वाढला, दुसऱ्यांदा शरीराचे लचके तोडले
'काय करायचंय ते कर पण मला जिवंत सोड', तरुणी घाबरल्याने दत्तात्रय गाडेचा आत्मविश्वास वाढला, दुसऱ्यांदा शरीराचे लचके तोडले
Rohit Sharma : रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध मोठा डाव खेळला, वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात किवी फलंदाजांची दैना 
रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला, वरुणनं जाळं टाकलं अन् मायदेशातील पराभवाचा वचपा काढला 
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
अधिवेशनाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्र्‍यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य; अण्णा हजारेंबद्दलही बोलले
Embed widget