एक्स्प्लोर

आधी जन्म कोरोना चाचणी किटचा, नंतर पोटातल्या बाळाला; पुण्यातील मराठमोळ्या महिलेची किमया

पुण्यातील एका मराठमोळ्या महिलेने गर्भवती असतानाही अहोरात्र मेहनत घेत कोरोना चाचणीचे किट अत्यंत कमी वेळेत विकसित केले आहे. या किटमुळे कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयांमध्ये होणार आहे. याच चाचणीला सध्या 4500 रुपयांपर्यंत खर्च येत आहे.

पुणे : देशात कोरोना चाचणींचं प्रमाणा आता मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण, कोरोना चाचणीचं किट्स पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकसित केलं आहे. विशेष म्हणजे हे किट्सचा श्रेय एका मराठमोठ्या महिलेला जातं. खूप कमी वेळात आणि स्वस्तात हे किट्स विकसित करण्यात आले आहे. जगभरात असे किट्सचे उत्पादन करण्याची परवानगी केवळ नऊ कंपन्यांना आहे. त्यामध्ये भारतातील या एकमेव कंपनीचा समावेश आहे. या कंपनीकडून आत्ता दररोज दहा हजार किट्सची निर्मिती करण्यात येत आहे. आगामी काळात त्यामध्ये वाढ करून दररोज पंचवीस हजार किट्स तयार करण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली तेव्हा मीनल डाखवे-भोसले ह्या साडेसात महिन्याच्या गर्भवती होत्या. कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरायला सुरुवात झाली होती. पुरेशा टेस्टिंग लॅब नसल्यानं अडचण मोठी होती. त्यातही इंम्पोर्टेट किटमधून केलेल्या टेस्टचा रिझल्ट यायला 6 ते 7 तास लागायचे. त्यामुळे देशातील 118 लॅब्जवर जवळपास 130 कोटी जनतेचा भार होता. हीच अडचण ओळखून पिंपरी-चिंचवडच्या मायलॅबनं संशोधन सुरू केलं. तेही कोविड 19 च्या टेस्टिंग किटचं. त्याचं नेतृत्व करत होत्या मीनल.

Coronavirus | मेड इन इंडिया : पुण्यातील मायलॅब कंपनीत बनणार कोरोना चाचणी किट्स

पोटातल्या बाळाच्या जन्माअगोदर एक दिवस किट पूर्ण कोविडसारख्या विषाणूच्या चाचण्या करणारी किट्स बनवायला एरवी 3 ते 4 महिने लागतात. पण मीनल यांनी हे किट अवघ्या सहा आठवड्यात बनवलं. ज्यावेळी मीनल किट्स बनवण्यात गुंतल्या होत्या, तेव्हा मानसिक आणि शारिरीक चॅलेंजही होतं. कारण त्यांच्या पोटात एक जीव वाढत होता. पण त्याची फिकीर न करता त्या संशोधन करत राहिल्या. अखेर बाळाच्या जन्माआधी एक दिवस आधी कोविड 19 ची टेस्ट करणारं किट जन्माला आलं. एका अर्थानं मीनल यांनी एकावेळी दोन बाळांनाच जन्म दिला.

घरी पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्यांना टोलनाक्यावर अन्न-पाणी पुरवा : नितीन गडकरी

अवघ्या 1200 रुपयात कोरोना चाचणी मीनल यांनी बनवलेल्या किटमुळे अवघ्या 1200 रुपयात कोविड 19 ची टेस्ट होते. परदेशातून आयात केलेल्या किटच्या मदतीनं टेस्ट करायला 4500 रुपये लागतात. मीनल यांच्या किटमध्ये झालेल्या टेस्टचा रिझल्ट अवघ्या अडीच तासात येतो. परदेशातून आयात केलेलं किट टेस्टचा रिझल्ट द्यायला सहा ते सात तास घेतात. मीनल यांनी बनवलेलं किट एकाचवेळी 100 टेस्ट करण्याइतकं सक्षम आहे. मायलॅबनं तयार केलेल्या किटला आयसीएमआरनं मान्यता दिलीय. भारतीय कंपनीनं तयार केलेलं आणि 100 टक्के अचूक रिझल्ट देणारं एकमेव किट असल्याचंही आयसीएमआरनं म्हटलंय.

सांगलीच्या इस्लामपुरात कोरोनाबाधितांची संख्या 23, एकाच कुटुंबातील 23 जणांना कोरोना विषाणूची लागण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget