एक्स्प्लोर
सर्वांना दिलासा देणारी बातमी; पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह
राज्यात पहिल्यांदा पुण्यात एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आता त्याच दाम्पत्यावर उपचारानंतर पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
पुणे : कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांची वाढती संख्या सर्वांचीच चिंता वाढवत आहे. अशात सर्वांना दिलासा देणारी एक बातमी आली आहे. महाराष्ट्रातील पहिले कोरोना बाधित पती पत्नीची टेस्ट आता निगेटिव्ह आली आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे सॅपल्स टेस्टिंगसाठी पाठवले जातील. ते देखील निगेटिव्ह आल्यास या दोघांना सर्व सोपस्कार पुर्ण करून घरी सोडण्यात येईल. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना हा आजार पूर्णपणे बरा होणारा आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याअगोदर औरंगाबादमधील एक महिला ठणठणीत बरी झाली आहे.
पुण्यातील पहिल्या दोन पॉझिटीव रुग्णांची चौदा दिवसानंतर टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे सॅपल्स टेस्टिंगसाठी पाठवले जातील. ते देखील निगेटिव्ह आल्यास या दोघांना सर्व सोपस्कार पुर्ण करून घरी सोडण्यात येईल. नऊ मार्चला हे दोघे पती पत्नी पॉझिटीव्ह ठरले होते. महाराष्ट्रात समोर आलेले कोरोना पॉझिटीव्ह ठरलेले हे पहिले रुग्ण होते. या दाम्पत्यासोबत त्यांची मुलीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. सोबतच ज्या कॅबने ते मुंबईहून पुण्याला आले होते. त्या कॅबचा चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे सामोरे आले होते. दरम्यान, आता या दाम्पत्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर, मुलगी आणि कॅब चालकावर अद्याप उपचार सुरू आहेत.
देशभरात आतापर्यंत 24 जण ठणठणीत
कोरोना व्हायरस आता वेगाने पसरत असून आता खेड्यापाड्यातही याचे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता चारशेहून अधिक झाला आहे. तर, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यासह देशभरात सध्या लॉकडाऊन केलं आहे. यामुळे देशात एकप्रकारचे भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच ही पॉझिटिव्ह बातमी आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान देशात आतापर्यंत 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात याअगोदर औरंगाबादमधील प्राध्यापिका कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो, असे सराकारकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला
राज्यात कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचा आकडा आता वेगाने वाढताना दिसत आहे. बातमी लिहताना हा आकडा 97 पर्यंत पोहचला आहे. यात मुंबईत सर्वाधिक 42 कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिघेही मुंबईतील आहेत.
पिंपरी चिंचवड मनपा – 12
पुणे मनपा – 15
मुंबई – 42
नागपूर – 4
सांगली - 4
यवतमाळ – 4
नवी मुंबई – 4
कल्याण – 4
अहमदनगर – 2
रायगड – 1
ठाणे – 1
उल्हासनगर – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
सातारा - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बीड
Advertisement