एक्स्प्लोर
Coronavirus | पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला पोलीस बंदोबस्तात डिस्चार्ज
दुबईहून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. कोविड-19 चे महाराष्ट्रातील ते पहिले रुग्ण ठरले होते. उपचारांनंतर कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्हा आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळला आहे.
पुणे : महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज (25 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना अॅम्ब्युलन्समधून पोलीस बंदोबस्तात घरी सोडण्यात आलं. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने हे दाम्पत्य आता ठणठणीत होऊन आज म्हणजेच गुढीपाडव्याला आपल्या घरी परतलं आहे. हे दाम्पत्य परतताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला, तर दाम्पत्याने हात जोडून त्यांचे आभार मानले.
दरम्यान पुढील 14 दिवस या दाम्पत्याला स्वत:ला होम क्वॉरन्टाईन करुन घ्यावं लागणार आहे. जेणेकरुन लोकांच्या मनात भीतीचं वातावरण राहणार नाही किंवा यांना लोकांकडून कोणता त्रास होणार नाही. कोरोना मुक्त झालेल्यांना शेजारच्यांनी किंवा सोसायटीमधल्या लोकांनी विरोध केला तर पोलीस तिथे असावेत, असा आरोग्य विभागाचा प्रोटोकॉल आहे. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात दाम्पत्य आपल्या घरी परतलं
Coronavirus | महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज डिस्चार्ज मिळणार!
परंतु यावेळी पोलिसांची भूमिका काहीशी विचित्र दिसली. सुरुवातीला पोलिसांनी तिथे येण्यास नकार दिला होता. आरोग्य विभागाचे अधिकारी त्यांना येण्यासाठी वारंवार विनंती करत होते. खरंतर दाम्पत्याची चाचणी कालच निगेटिव्ह आली होती. काल सकाळपासून हे दाम्पत्य आपलं साहित्य आवरुन तयार होतं. परंतु पोलीस या ठिकाणी यायला तयार नव्हतं. आजही हे दाम्पत्य अॅम्ब्युलन्समध्ये येऊन बसलं होतं. पोलीस नसल्यामुळे ते अर्धा तास अॅम्ब्युलन्समध्येच बसून राहिलं होतं. ही बातमी मीडियामध्ये आल्यानंतर काही वेळाने पोलिसांची व्हॅन आली आणि दाम्पत्याला घेऊन निघाले. या प्रसंगावरुन सर्वसामान्यांसह पोलिसांमध्येही कोरोनाबाबत अज्ञान, चुकीची माहिती असल्याचं समोर आलं.
महाराष्ट्रातील पहिले कोरोनाबाधित रुग्ण
पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिले कोविड-19 चे रुग्ण होते. दुबईहून परतलेल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर होळीला (9 मार्च) नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. इथे 15 ते 16 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.
सर्वांना दिलासा देणारी बातमी; पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह
दरम्यान या दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने त्यांची मुलगी तसंच त्यांना मुंबईहून पुण्याला सोडणाऱ्या ओला सेवेच्या चालकालाही कोरोनाची लागण झाली होती. दोघांवरही उपचार सुरु आहेत. दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या चाचणीचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर चालकाच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल यायचा आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे.
मुंबईतील 12 कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 12 कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह समोर आली आहे. मात्र असं असलं तरी त्यांना पुढील चौदा दिवस क्वॉरन्टाईन अर्थात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे.
Coronavirus | डॉक्टरांना मोठं यश, मुंबईतील 12 कोरोनाबाधितांची चाचणी निगेटिव्ह
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
मुंबई शहर आणि उपनगर - 41
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 19
नवी मुंबई - 5
कल्याण - 5
नागपूर - 4
यवतमाळ - 4
सांगली - 9
अहमदनगर - 3
ठाणे - 3
सातारा - 2
पनवेल- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1
एकूण - 112
पोलिसांची विचित्र भूमिका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement