एक्स्प्लोर
Coronavirus | महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज डिस्चार्ज मिळणार!
दुबईहून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. कोविड-19 चे महाराष्ट्रातील ते पहिले रुग्ण ठरले होते. उपचारांनंतर कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्हा आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.

पुणे : महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज (25 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना अॅम्ब्युलन्समधून घरी सोडण्यात येईल. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने हे दाम्पत्य आता ठणठणीत होऊन आज म्हणजेच गुढीपाडव्याला आपल्या घरी परतणार आहे. पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिले कोविड-19 चे रुग्ण होते. दुबईहून परतलेल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर होळीच्या दिवशी ते नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. चौदा दिवसांनी त्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांचे नमुने पुन्हा एकदा घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. सर्वांना दिलासा देणारी बातमी; पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह दरम्यान या दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने त्यांची मुलगी तसंच त्यांना मुंबईहून पुण्याला सोडणाऱ्या ओला कॅब चालकालाही कोरोनाची लागण झाली होती. दोघांवरही उपचार सुरु आहेत. दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या चाचणीचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर चालकाच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल यायचा आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. Coronavirus | डॉक्टरांना मोठं यश, मुंबईतील 12 कोरोनाबाधितांची चाचणी निगेटिव्ह मुंबईतील 12 कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 12 कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह समोर आली आहे. मात्र असं असलं तरी त्यांना पुढील चौदा दिवस क्वॉरन्टाईन अर्थात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असून 107 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन जणांचा कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर देशभरातील मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई शहर आणि उपनगर - 41 पिंपरी चिंचवड मनपा - 12 पुणे मनपा - 19 नवी मुंबई - 5 कल्याण - 5 नागपूर - 4 यवतमाळ - 4 सांगली - 4 अहमदनगर - 3 ठाणे - 3 सातारा - 2 पनवेल- 1 उल्हासनगर - 1 औरंगाबाद - 1 रत्नागिरी - 1 वसई-विरार - 1
आणखी वाचा























