एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू, कोंढवा परिसरातील ह्रदयद्रावक घटना
पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
पुणे : पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.
पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
Pune Wall Collapse | पुण्यात मृत्यूचं तांडव, कोंढवा परिसरात भिंत कोसळून 16 मजुरांचा मृत्यू | ABP Majha
या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरु आहे. त्याला लागूनच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या होत्या. परंतु रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली. आसपासचा परिसरातील जमीन खचली, ज्यामध्ये मजुरांच्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत.
घटनेची काही छायाचित्रे
आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. हे सर्व मजूर बंगाल आणि बिहारमधून आलेले आहेत.Pune: 12 have died and 2 are injured after a wall collapsed in Kondhwa. Rescue operations are underway. #Maharashtra pic.twitter.com/J8K3BO3fLm
— ANI (@ANI) June 29, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement