एक्स्प्लोर
आवडत्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कॉलेज तरुणाची आत्महत्या
पुणे : खडकी येथील 22 वर्षीय हर्षवर्धनसिंग राघव या महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. हर्षवर्धन हा सिम्बॉयसिस महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. काल रात्री 9 वाजताच्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. आवडत्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने हर्षवर्धनसिंगने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमधून समोर आले आहे.
हर्षवर्धनसिंग मुळचा छत्तीसगडचा राहणारा होता. मागील दोन वर्षांपासून तो शिक्षणासाठी पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या हॉस्टेलमधे राहत होता. शनिवार आणि रविवार या दोन सुट्टीच्या दिवशी हडपसरला नातेवाईकांच्या फ्लॅटमध्ये रहायला जायचा.
हर्षवर्धनसिंग पुण्यात राहत असला तरी छत्तीसगडमधील त्याच्या घरी असलेल्या कुत्र्याबद्दल त्याचा लळा कायम होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याच्या बोस्की नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हर्षवर्धनसिंग निराश होता. हडपसरमधील नातेवाईकांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधून उडी मारुन त्याने आत्महत्या केली. त्याआधी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये, 'मी माझ्या बोस्कीकडे जात आहे. त्याबद्दल कोणाला दोष देऊ नये', असं म्हटलं आहे.
हडपसर पोलिस ठाण्यात हर्षवर्धनच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. शिवाय, सुसाईड नोटमधील उल्लेख केलेलं आत्महत्येचं कारण खरं आहे की आणखी काही, याचा तपास हडपसर पोलिसांनी सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement