एक्स्प्लोर

Satej Patil: मिशन कोल्हापूर महापालिका! ज्यांना निर्णय घ्यायचा त्यांनी आताच घ्यावा, अन्यथा माझा मुक्काम त्याच वाॅर्डात करून करेक्ट कार्यक्रम करणार; सतेज पाटलांचा गर्भित इशारा

Satej Patil: जे कोणी शेवटच्या क्षणी स्टार्ट सोडतील तेव्हा माझा मुक्काम त्याच वाॅर्डात असेल, त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा सतेज पाटील यांनी दिला.

Satej Patil on Kolhapur Municipal Corporation Election: बंटी पाटील म्हणजे माणसं तयार करणारे फॅक्टरी आहे. ज्यांना मोठे केलं ते जात आहेत, याचा काही फरक पडत नाही. जे गेले आहेत त्यांनी निर्णय घेतला आहे. जे अजूनही नाराज आहेत त्यांनीही निर्णय घ्यावा,  पण जे शेवटच्या क्षणी साथ सोडण्याच्या निर्णय घेतील ते माझ्या टार्गेटवर असतील जे कोणी शेवटच्या क्षणी स्टार्ट सोडतील तेव्हा माझा मुक्काम त्याच वाॅर्डात असेल, त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यामध्ये दिला.  

आता आपल्याला खचून चालणार नाही

काल (26 जुलै) काँग्रेस जिल्हा कमिटीमध्ये काँग्रेसचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला खासदार शाहू महाराज यांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळी बोलताना पाटील यांनी कोल्हापूर महापालिका एकच मिशन असल्याचे लक्षात ठेवा असा निर्धार या मेळाव्यामध्ये बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले की शाहू महाराज माझं काही चुकच असेल तर नक्की सांगा. मी आयुष्यभर काँग्रेस म्हणूनच काम करणार असल्याचं पाटील म्हणाले. ते म्हणाले की आता आपल्याला खचून चालणार नाही लढाई आपली आहे. तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं असणे गरजेची आहेत. फौज किती मोठी असली तरी हम ही जितेंगे हे लक्षात ठेवा असं पाटील यांनी सांगितले. 

18 ते 25 वयोगटापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला पाहिजे

ते पुढे म्हणाले की whatsapp, instagram वर काँग्रेस पक्ष नाही, तर लोकांपर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष ताकतीने उभा राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये 18 ते 25 वयोगटापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला पाहिजे असे आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले की या वयोगटाला भाजपचा वास्तव सांगितले पाहिजे. आयुष्यामध्ये आतापर्यंत अनेक चढउतार आले आहेत. परंतु काँग्रेस पक्ष संपला नाही, चार हजार किलोमीटर पदयात्रा करण्याचे काम राहुल गांधीनी केलं. बहुजन समाज कसा विस्कटेल हे भाजप काम करत असल्याचे पाटील म्हणाले. आपल्याला खचून चालणार नाही, लढाई आपली असल्याचे ते म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास सुरु आहे, पण शक्तिपीठवरून सत्तेतील आमदार भेटून तुमची भूमिका योग्य असल्याचे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की सरकार वेगवेगळ्या दिशेला निघालं आहे. कुणाचा पायपोस कोणालाही नसल्याची स्थिती आहे. पाशवी बहुमत असल्याने एक माज या सरकारला आला असल्यचा हल्लाबोल सुद्धा पाटील यांनी केला. ते म्हणाले की आपल्या राज्याच्या आर्थिक कारभार पाहिला, तर भविष्यात बसणार आहे. शेतकरी अडचणी आल्यानंतर आत्महत्या करत आहे, पण आता कॉन्ट्रॅक्टरसारखा तरुण आत्महत्या करत असल्याचे ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget