Pune Crime Rave Party: पोलिसांना ऑनलाईन हाऊस पार्टीची टीप मिळाली, पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकताच समोर काय दिसलं?
Pune crime Rave party: मोठी बातमी: एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद. खराडी परिसरातील एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीमध्ये पार्टी

Pune Crime Rave Party: पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. खराडी परिसरातील एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हाऊस पार्टीसाठी तीन फ्लॅट बूक करण्यात आले होते. यापैकी एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरु होती. या पार्टीत ड्रग्जचे सेवन केले जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी या फ्लॅटमध्ये दोन महिला आणि पाच पुरुष आढळून आले. पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने फ्लॅट बुक करुन ही हाऊस पार्टी आयोजित केली होती. खराडीतील या रहिवाशी सोसायटीमध्ये पार्टीसाठी फ्लॅट भाड्याने दिले जातात. पोलिसांनी मध्यरात्री याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी फ्लॅटमध्ये दारु, हुक्का आणि अंमली पदार्थ सापडले होते. त्याआधारे पोलिसांनी पार्टीला उपस्थित असणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. आता त्यांच्या रक्तामध्ये ड्रग्जचे अंश आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
या रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांनाही अटक केल्याची माहिती आहे. त्यांनी ड्रग्ज सेवन केले होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्याकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांच्या जावयावर झालेल्या कारवाईला राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे.
ही पार्टी दारु, हुक्का यापुरती मर्यादित असती तर पोलिसांनी कारवाई केली नसती. मात्र, या पार्टीत ड्रग्ज सापडले आहेत. आता प्रांजल खेवलकर यांच्या रक्तात ड्रग्जचे अंश सापडतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच प्रांजल खेवलकर यांच्यासोबत असलेल्या महिला कोण आहेत, याविषयीही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी: एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद
पुण्यातील रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली, एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, पाहा PHOTOS























