एक्स्प्लोर
मनपाच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनगळती
पुणे : महानगरपालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रामधे मध्यरात्री दोन वाजल्यापासून क्लोरिन वायूची गळती सुरु आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी वायूगळती थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
वायुगळतीमुळे मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर दोघांना संजीवनी हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं.
अग्निशमन दलाला 80% वायूगळती रोखण्यात यश आलं असून धोका टळल्याचं सांगितलं जातं. संबंधित कंपनीचे टेक्निकल पथक वायूगळती पूर्णपणे थांबवण्यासाठी मुंबईहून रवाना झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement