एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal :  देवी सरस्वतीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिलं?; छगन भुजबळांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal News:  मंत्री छगन भुजबळ यांनी सरवस्ती देवीच्या पूजेवर पुन्हा एकदा भाष्य  केलंं आहे.  सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिलं?, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Chhagan Bhujbal :  मंत्री छगन भुजबळ यांनी सरवस्ती देवीच्या पूजेवर पुन्हा एकदा भाष्य  केलंं आहे. सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिलं? जर त्यांनी शिक्षण दिलं तर मग महात्मा फुलेंना का पाऊल टाकावं लागलं? ब्राम्हण समाजात (Political News) फक्त पुरुषांना शिक्षण दिलं जायचं. ते ही महिलांना शिक्षण देत नव्हते. म्हणून म्हणतो मी फक्त सरस्वतीची पूजा का? त्यामुळं सावित्रीबाई फुलेंना स्थान द्या, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केलं आहे. ते पुण्यात (pune) बोलत होते. 

भुजबळ म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपतींचा, सावित्रीबाईसह अनेकांचा अपमान करत आहेत. आता रामदेव बाबादेखील महिलांबाबत भयंकर बोलले. त्यावेळी अमृता फडणवीस त्याच कार्यक्रमात उपस्थित होत्या. आज त्या म्हणाल्या की सभ्य भाषेत बोलायला हवं होतं. म्हणजे ते असभ्य भाषेत बोलले हे त्यांच्या बोलण्यावरुन सिद्ध झालं आहे. महत्वाचं म्हणजे यांना काहीही बोलण्याचा कोणी अधिकार दिला. यांचं धारिष्ट्य होतं कसं? आज छत्रपतींचं राज्य असायला हवं. मग बघा यांचं धाडस होतं का?, अशा शब्दांत त्यांनी कोश्यारींना खडसावलं आहे. 

भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक ठिकाणी असतो याचा आम्हाला आनंद आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान आहे. त्याबाबत ही काही दुमत नाही, पण महात्मा फुलेंच्या बाबतीत असं घडत नाही. ते दुर्लक्षित असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे लवकरच भिडे वाड्याची अवस्था सुधारण्याबाबत सरकारशी चर्चा करणार आहोत. या वाड्याच्या सुधारणेसाठी सरकारकडे मागणीदेखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

'शंकर, पार्वती, तीस कोटी देवाचाही अभ्यास सुरु करा'

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता गणपतीचं अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात आणलं. उद्या शंकर, पार्वती, तीस कोटी देवाचाही अभ्यास सुरु करा. बाकीचं शिक्षण बंद करा. हेच शिकत बसलंं कशा नोकऱ्या लागतील. हे सगळं मुद्दाम केलं जातं आहे. यांच्याविरोधात आवाज उठवावा लागेल. कोणाची परवानगी नसताना हा प्रकार सुरु आहे, असा घणाघात छगन भुजबळ यांनी केला आहे.

'अन्यथा आंदोलन करु'
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं नाव आपण अभिमानानं घेतो. पण त्यांनी जिथं शिक्षणाचं मोठं कार्य उभारलं त्या भिडेवाड्याची आजची अवस्था वाईट आहे. मी आजदेखील मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याची बैठक घ्यायला सांगितलं आहे. त्या दोघांनीही लवकरच पुण्यात यासंदर्भात बैठक घेऊ असं सांगितले आहे. थोडे दिवस वाट बघू, अन्यथा आंदोलन करावं लागणार आहे, असा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget