एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mahesh Landge : भाजप आमदार महेश लांडगे प्रोटोकॉल तोडतात, त्यांना शहराध्यक्षांचं वावडं? पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडेच केली तक्रार

Mahesh Landge : : भाजपचे आमदार महेश लांडगे यांना शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे वावडे आहे का? असा सवाल उपस्थित करत पदाधिकाऱ्यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

पिंपरी चिंचवड : भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांना शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांचे वावडे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत भाजप चिटणीस सचिन काळभोरांनी (Sachin Kalbhor) थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे भाजपमधील (BJP) अंतर्गत धुसपूस समोर आले आहे.  

भाजप चिटणीस सचिन काळभोर यांनी म्हटले आहे की, आमदार महेश लांडगे हे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा उल्लेख टाळतात. त्यांचा फोटो कुठेही वापरत नाही. पक्षाच्या बैठकीला देखील ते हजर राहत नाहीत, अशा पद्धतीने महेश लांडगे हे प्रोटोकॉल तोडतात, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आम्ही करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

महेश लांडगे प्रोटोकॉल तोडतात

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघात सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमासाठी भाजपचे कार्यकर्ते शंकर जगताप यांचे शहराध्यक्ष म्हणून फोटो फ्लेक्स छापतात. त्यामुळे चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघात सामान्य नागरिकांना शंकर जगताप परिचित आहेत. तर भोसरी विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप यांच्या जाहिरात बोर्ड तसेच फ्लेक्सवर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल नियमानुसार फोटो छापला जात नाही किंवा टाळले जाते. त्यामुळे या मतदारसंघात संघात शंकर जगताप हे शहराध्यक्ष आहेत की नाही? याची कल्पनाही सामान्य नागरिकांना नाही. लोकसभा निवडणुकीत शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे फोटो जाहिरात बोर्डवर छापण्यात आले नव्हते. तसेच महेश लांडगे शंकर जगताप यांचे फोटो लावण्यात टाळाटाळ करतात, असे सचिन काळभोर यांनी म्हटले आहे.  

महेश लांडगेंवर शिस्तभंगाची कारवाई करावी

येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे हे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे फोटो फ्लेक्सवर लावणार की नाही? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना वैयक्तिक पातळीवर लेखी पत्राद्वारे समज पत्र द्यावे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. आता यावर महेश लांडगे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात नाराजी? नाराज पदाधिकाऱ्यांना डावलून कुर्ल्यातील नव्या नियुक्त्या जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Embed widget