Asaram Bapu Pune : आसाराम बापूंना तातडीने जामीन द्या; पुण्यात बापूंच्या शिष्यांची मुक मोर्चातून मागणी
श्री आसाराम बापू यांच्या अटकेला 30 ऑगस्टला 9 वर्ष झाले तरीदेखील जामीन मिळाला नाही. त्यांना तातडीने जामीन मिळावा, या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती साधक मंडळातर्फे मुक मोर्चा काढण्यात आला.
Asaram Bapu Pune : श्री आसाराम बापू यांच्या अटकेला 30 ऑगस्टला 9 वर्ष झाले तरीदेखील जामीन मिळाला नाही. त्यांना तातडीने जामीन मिळावा, या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती साधक मंडळातर्फे मुक मोर्चा काढण्यात आला. शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिष्यांनी काळ्या फिती लावून निषेध दर्शवला आहे.
सर्वांनी पांढऱ्या कपडे परिधान करून दंडाला काळया फिती लावल्या होत्या आणि हातात भगवे ध्वज घेतले होते.' बापू को रिहा करो ', ' संत न होते तो जल मरता संसार ', 'नही सहेंगे अत्याचार, झूठे आरोपोंका हो बहिष्कार', अशा अनेक प्रकारच्या घोषणांचे फलक साधकांनी हाती घेतले होते. न्यायालयीन प्रक्रिया संथ गतीने चालत असून न्याय मिळण्यात विलंब होत आहे, याची शासन, समाज आणि न्यायालयाने दखल घ्यावी, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. शनीवारवाडा, लाल महाल,फडके हौद, दारूवाला पूल, 15 ऑगस्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालून राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
लैंगिक शोषणाचा आरोप खोटा आहे. ते निर्दोष आहेत. भारत आणि भारताबाहेर देखील त्यांचे शिष्य आहेत. 80 कोटींपेक्षा जास्त त्यांच्या शिष्यांची संख्या आहे. जगाच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी आजपर्यंत मातृपितृ दिन साजरा केला. त्यासोबतच बालशिक्षण केंद्र आणि तुळशी पुजानाचा संदेश देखील त्यांनी दिला आहे. सनातन संस्कृती आणि इतर समाजाच्या लोकांनी देखील त्यांना मान्यता दिली आहे. सगळ्या विश्वात त्यांचं विश्वगुरु म्हणून स्वागत केलं जातं. हा त्यांच्यावर अन्याय आहे, असं मत त्यांच्या शिष्यांनी व्यक्त केलं आहे.
हिन्दू धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी कार्य केलं त्या सगळ्यांवर अन्याय झाला आहे. आसाराम बापूंवर जो आरोप झाला आहे. तो सिद्ध करण्यासाठी कोणाकडेच काहीही पुरावा नाही आहे. FIR मध्ये बलात्काराचा उल्लेख नाही आहे. मेडीकल रिपोर्टही नीट आहे. मुलगी देखील नाबालिक नाही आहे तर पोस्को अॅक्ट कसा लावला,असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
अनेक आदिवासी भागांमध्ये हिन्दूंना धर्मांतरीत करुन प्रलोभने देऊन ख्रिश्चन बनवण्यात येत होते. गुजरातच्या डांग जिल्ह्यातील आधिवासींना आसाराम बापूनी ख्रिश्चन धर्मातून घरवापसी केली. त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी आणि काही कंपन्यांचाही या षडयंत्रात हात आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.