Pune News: दिलीप वळसे अन् देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, भीमाशंकर कारखान्याच्या बैठकीत वळसेंसमोरचं गोंधळ
Pune News: शरद पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या देवदत्त निकमांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. दिलीप वळसेंच्या समोर हा गदारोळ झाला.
![Pune News: दिलीप वळसे अन् देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, भीमाशंकर कारखान्याच्या बैठकीत वळसेंसमोरचं गोंधळ Argument between workers of Dilip Walse Patil and Devdutt Nikam in front of Walse Patil in Bhimashankar suger factory meeting Pune News: दिलीप वळसे अन् देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, भीमाशंकर कारखान्याच्या बैठकीत वळसेंसमोरचं गोंधळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/b910e04116851e2d296270231e23765d17256171303451075_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: पुण्यातील आंबेगाव विधानसभेत मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या देवदत्त निकमांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. दिलीप वळसेंच्या समोर हा गदारोळ झाला. भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत हा गोंधळ झाला आहे. मात्र त्यामुळं आगामी विधानसभेची किनार या घटनेला आहे.
आजच्या सर्व साधारण सभेत बसण्याच्या मुद्द्यावरून वळसे (Dilip Walse Patil) आणि निकमांचे समर्थक एकमेकांत भिडताना दिसले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्यानं सभेत गदारोळ झाला. काहींनी खुर्च्या ही नाचवल्या. वळसे पाटलांसमोर हा गोंधळ झाला. वळसे पाटलांनी विनवणी केल्यानंतर ही कार्यकर्त्यांचा गदारोळ सुरुचं होता, शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर वातावरण निवळले आणि वार्षिक सर्व साधारण सभा सुरू झाली.
दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी यावेळी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र, कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून आलं नाही.शरद पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या देवदत्त निकमांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत हा गोंधळ झाला आहे. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर वातावरण निवळले आणि वार्षिक सर्व साधारण सभा सुरू झाली. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
शरद पवार गटाचे देवदत्त निकमांना मंचावर येण्यापासून रोखलं त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं म्हटलं आहे. तर अजित पवार गटाने सर्व साधारण सभेत गुंड आणून आम्हाला रोखले असं म्हणत शरद पवार गटाच्या देवदत्त निकमांनी आरोप केला आहे. देवदत्त निकमांना बाहेर काढल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)