Vasant More : भर सभेत फेसबूक लाईव्ह करत माध्यमांवर टीका, मग सारवासारव; वसंत मोरेंना माध्यमांसमोर दिलगीरी का व्यक्त करावी लागली?
पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) हे सोशल मीडिया आणि सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात.
![Vasant More : भर सभेत फेसबूक लाईव्ह करत माध्यमांवर टीका, मग सारवासारव; वसंत मोरेंना माध्यमांसमोर दिलगीरी का व्यक्त करावी लागली? VBA Pune Loksabha candidate Vasant More Apologise media Person For controversial Statement Marathi news Vasant More : भर सभेत फेसबूक लाईव्ह करत माध्यमांवर टीका, मग सारवासारव; वसंत मोरेंना माध्यमांसमोर दिलगीरी का व्यक्त करावी लागली?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/20/63c54195022e4768ec49da03aff947321713612167456442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) हे सोशल मीडिया आणि सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. मात्र पुण्यातील एका सभेत बोलताना वसंत मोरेंनी गेल्या काही दिवसांपासून सगळ्या मिडीयाने पाकीट घेऊन आपल्याला प्रसिद्धी द्यायच थांबवल्याचं म्हटलं आहे. यावर वसंत मोरेंना पत्रकारांनी विचारल असता मला सगळ्या मिडीया बाबत असे म्हणायचे नव्हते, काही मिडीया बाबत म्हणायचे होते अशी सारवासारव मोरेंनी केली आहे.
त्यानंतर त्यांनी दिलगीरीदेखील व्यक्त केली. गैरसमजातून काही बोललो असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असंही वसंत मोरे म्हणालेत.आपण जे बोललो त्याचे आपल्याकडे पुरावे असून योग्य वेळी आपण ते सादर करु, असं वसंत मोरेंनी म्हटलंय. मात्र मिडियाने तुमच्या कुठल्या सभा, पत्रकार परिषद किंवा प्रचाराला प्रसिद्धी दिली नाही, असं पत्रकारांनी विचारल असता वसंत मोरे त्याच उत्तर देऊ शकले नाहीत.
वसंत मोरेंनी भाषणात नेमकं काय म्हटलं?
मागील पाच सहा दिवसांपासून मी चॅनलवर दिसणं बंद झालं आहे. प्रत्येक चॅनलवाल्यांना पाकीट आलं आहे. त्यामुळे माझं दिसणं बंद झालं आहे. मात्र आपलं चॅनल किती मोठं आहे हे चॅनल वाल्यांना माहित नाही आहे. आपल्या चॅनलवर एक लाईव्ह गेलं कि चॅनलवाल्यांना बातमी करावी लागते. नाहीतर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे. अनेक चॅनलवाले पेड न्यूजसाठी येतात. मात्र मला पेड न्यूज करायची गरज नाही. मी 365 दिवस काम करतो, असं त्यांनी एका सभेच्या भाषणात म्हटलं आहे.
दिलगीरी व्यक्त केली?
वसंत मोरेंना या भाषणामुळे दिलगीरी व्यक्त करावी लागली आहे. यावेळी पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले मात्र वसंत मोरेंनी या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं आहे. माध्यमांना पाकीटं मिळाल्याने बातम्या छापणं बंद केलं, असा आरोप त्यांनी माध्यमांवर केला. मात्र या संदर्भात स्पष्टीकरण मी सभेत देणार, असं वसंत मोरे म्हणाले. मी सगळ्याच माध्यमांना असं काही म्हटलं नाही तर काही माध्यमांना उद्देशून मी विधान केल्याचं ते म्हणाले. त्यासोबतच मी उमेदवारी अर्जासंदर्भातदेखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षाच्या आदेशानुसार मी काम करत आहे आणि त्यानुसारच काम करणार आहे, असं ते म्हणाले.
हेही वाचा :
माजी मुख्यमंत्र्यांचा जावई अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार? ऐन निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का!
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)