एक्स्प्लोर

माजी मुख्यमंत्र्यांचा जावई अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार? ऐन निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का!

ऐन निवडणुकीत रागयगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

रायगड : ऐन लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅ. ए. आर. अंतुले (A R Antulay) यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले (Mushtaq Antulay) लवकरच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक अंतुले यांचा येत्या 23 एप्रील रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (अजित पवार गट)  प्रवेश करणार आहेत, असे म्हटले जात आहे. 

अंतुले आणि तटकरे एकमेकांचे मित्र

मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळातही महत्त्वाची जबाबदारी पार पडलेली आहे. मुश्ताक अंतले आणि सुनिल तटकरे यांचे जवळचे संबंध आहे. अनेक कार्यक्रमानिमित्त या दोन्ही नेत्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे असते. असे असतानाच आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अंतुले राष्ट्रवादीत (अजित पवार गट) जाणार असल्याचे म्हटले जात आहे.  

काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून मुश्ताक यांची ओळख

राज्याचे आठवे मुख्यमंत्री स्वर्गवासी बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निधनानंतर मुश्ताक अंतुले यांनी बॅरीस्टर अंतुले यांचा राजकीय वारसा सांभाळलेला आहे. मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाता. गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसचे काम करत आहेत. मात्र आता अचानकपणे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा चालू झाली आहे. मुश्ताक यांनी अद्याप राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र मुश्ताक यांच्या निटवकर्तीयांकडून ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असे सांगितले जात आहे.

अल्पसंख्याकांच्या मतासाठी तटकरेंचा डाव?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अनंत गीते यांना उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीतील विजयासाठी तटकरे कंबर कसून प्रचार करत आहेत. आपली ताकद वाढावी यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये शेकाप, शिवसेना (ठाकरे गट) आदी पक्षातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मुश्ताक अंतुले हे अल्पसंख्याक समाजूतन येतात. अंतुले यांच्या प्रवेशामुळे रायगड मतदारसंघातील अल्पसंख्याक मतदार आपल्याकडे वळतील, अशी आशा तटकरे यांना वाटत असावी. त्यामुळे आगामी काळात तटकरे यांच्या राजकीय डावपेचाचा नेमका काय परिणाम होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 
हेही वाचा :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare: अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? वडील पक्षाचे बादशहा म्हणून...; सुषमा अंधारेंनी सुनावलं, म्हणाल्या झेपत नसेल तर राजीनामा द्या
अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? वडील पक्षाचे बादशहा म्हणून...; सुषमा अंधारेंनी सुनावलं, म्हणाल्या झेपत नसेल तर राजीनामा द्या
Thalapathy Vijay : विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा, राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण, शपथविधीची तारीखही ठरली
विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा, राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण, शपथविधीची तारीखही ठरली
Sharad Pawar: आजारपणातून बरे होताच शरद पवारांचा पहिला दौरा 'सातारा'; कर्मवीरांच्या नगरीत मुक्कामी, भाषणाकडे सर्वांचे लक्ष
Sharad Pawar: आजारपणातून बरे होताच शरद पवारांचा पहिला दौरा 'सातारा'; कर्मवीरांच्या नगरीत मुक्कामी, भाषणाकडे सर्वांचे लक्ष
Mamata Banerjee : सत्ता गमावताच ममता बॅनर्जींचे 'खंद्या समर्थकांनी' सोडली साथ; राजीनाम्यांचा सपाटाच सुरू; कोण कोण सोडून गेले?
सत्ता गमावताच ममता बॅनर्जींचे 'खंद्या समर्थकांनी' सोडली साथ; राजीनाम्यांचा सपाटाच सुरू; कोण कोण सोडून गेले?

व्हिडीओ

Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, लातूरमधून उचचलं
मोठी बातमी! भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, लातूरमधून उचचलं
Sharad Pawar: आजारपणातून बरे होताच शरद पवारांचा पहिला दौरा 'सातारा'; कर्मवीरांच्या नगरीत मुक्कामी, भाषणाकडे सर्वांचे लक्ष
Sharad Pawar: आजारपणातून बरे होताच शरद पवारांचा पहिला दौरा 'सातारा'; कर्मवीरांच्या नगरीत मुक्कामी, भाषणाकडे सर्वांचे लक्ष
Thalapathy Vijay: आठ वर्षांपूर्वीच 'सरकार' चित्रपटातून 'सरकार'चा पाया? त्या नंबर प्लेटने सुद्धा लक्ष वेधलं! स्वप्नपूर्ती होताच समर्थक विजयच्या शपथविधीसाठी मैदानात पोहोचले, पण..
आठ वर्षांपूर्वीच 'सरकार' चित्रपटातून 'सरकार'चा पाया? त्या नंबर प्लेटने सुद्धा लक्ष वेधलं! स्वप्नपूर्ती होताच समर्थक विजयच्या शपथविधीसाठी मैदानात पोहोचले, पण..
Raigad Shivsena Congress Alliance: मोठी बातमी : शिंदेसेना आणि काँग्रेस एकत्र, रायगडमध्ये नवा पॅटर्न, म्हसळा नगरपंचायतीवर झेंडा फडकताच सुनील तटकरेंचा फोटो हटवला!
रायगडमध्ये शिंदेसेना-काँग्रेस एकत्र, म्हसळा नगरपंचायतीवर झेंडा फडकताच सुनील तटकरेंचा फोटो हटवला!
Video: संजय राऊत संतापले, म्हणाले, इथं धर्मध्वज फडकवता अन् सीता-समान माता-भगिनींना मारहाण करता
Video: संजय राऊत संतापले, म्हणाले, इथं धर्मध्वज फडकवता अन् सीता-समान माता-भगिनींना मारहाण करता
'जातीयवाद्यांनी नोंद घ्यावी..' मुस्लिमबहुल मतदारसंघात ख्रिश्चन उमेदवार जिंकला, हिंदू आणि ख्रिश्चन बहुल मतदारसंघात मुस्लीम उमेदवाराची बाजी; शशी थरुरांनी 'द रिअल केरळ स्टोरी' सांगितली
'जातीयवाद्यांनी नोंद घ्यावी..' मुस्लिमबहुल मतदारसंघात ख्रिश्चन उमेदवार जिंकला, हिंदू आणि ख्रिश्चनबहुल मतदारसंघात मुस्लीम उमेदवाराची बाजी; शशी थरुरांनी 'द रिअल केरळ स्टोरी' सांगितली
तमिळनाडूत राज्यपालांनी टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही थलापती विजयना बहुमत नसल्याचं सांगितलं; प्रकाश आंबेडकरांनी वाजपेयी, राजीव गांधींचं उदाहरण देत कोणती मागणी केली?
तमिळनाडूत राज्यपालांनी टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही थलापती विजयना बहुमत नसल्याचं सांगितलं; प्रकाश आंबेडकरांनी वाजपेयी, राजीव गांधींचं उदाहरण देत कोणती मागणी केली?
Raja Shivaji Box Office Collection Day 6: 'राजा शिवाजी'च्या कमाईत सलग तिसऱ्या दिवशी घट, पण तरीसुद्धा रचणार धमाकेदार रेकॉर्ड; फक्त काही पावलं दूर अन्...
'राजा शिवाजी'च्या कमाईत सलग तिसऱ्या दिवशी घट, पण तरीसुद्धा रचणार धमाकेदार रेकॉर्ड; फक्त काही पावलं दूर अन्...
Embed widget