Pune Crime News : निर्दयी पती! चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला ब्लेडचे तुकडे गिळायला लावले; पुण्यातील घटना
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला ब्लेडचे तुकडे कॅल्शियमच्या गोळ्यांमधून गिळायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 45 वर्षीय पतीनं पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे.
पुणे : पुण्यात कौटुंबिक हिंसाचारात वाढ होताना दिसत (Pune Crime News)आहे. रोज नवनव्या घटना समोर येत आहे. त्यातच चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला ब्लेडचे तुकडे कॅल्शियमच्या गोळ्यांमधून गिळायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 45 वर्षीय पतीनं पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. पुण्यातील उत्तमनगरमध्ये धक्कादायक प्रकार आला समोर आहे. सोमनाथ सपकाळ असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 41 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ऑक्टोबर पासून सुरू होता. गेल्या 2 महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये अनेक वाद विवाद सुरू होते. सोमनाथ हा अनेक वेळा त्याच्या पत्नीवर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद होऊन पती ने त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुद्धा केली होती. काही दिवसांपूर्वी सोमनाथ याचा भाऊ आणि तो मिळून घरी दारू प्यायला बसले असतानासुद्धा यावरून वाद झाले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून सोमनाथने पत्नीची हत्या करण्याचे ठरवले होते
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथ ने त्याच्या पत्नीला कॅल्शीअमच्या कॅप्सुल दिल्या पण त्यात आधी ब्लेडचे तुकडे टाकले आणि ते तिला खायला दिले. तसच त्याने तिला जबरदस्तीने ते गिळायला लावले. फिर्यादी यांच्या गळ्यात जखमा झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.
कौटुंबिक हिंसाचारात वाढ...
मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. त्यात हत्या, वाद आणि कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाणत जास्त असल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. कधी चारित्र्याच्या संशयावरुन तर कधी मुल बाळ होत नसल्याने पत्नीचा छळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी मुलबाळ होत नसल्याने सुनेच्या पाळीचं रक्त विकल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर सासरच्यांना पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच भोंदू बाबाच्या सांगण्यावरुन पत्नीला नग्न करुन सर्वांदेखत आंघोळ करायला लावल्याची घटना घडली होती. त्यावेळी देखील आरोपी असलेल्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरणं वाढत असून यावर आळा घालण्यात यावा, असा आवाज अनेकदा उठवला गेला आहे. मात्र तरीही समाजात या घटना घडतानाच दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-