(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Anil Bhosale : अनिल भोसलेंच्या पत्नी अन् मुलाला अजित पवारांनी भेट नाकारली, नेमकं काय घडलं?
येरवडा कारागृहात बंद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले आणि आणि त्यांच्या मुलाला अजित पवारांनी भेट नाकारली.
पुणे : येरवडा कारागृहात बंद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले आणि आणि त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट नाकारली. अजित पवारांना भेटण्यासाठी रेश्मा भोसले पुण्यातील सर्किट हाऊसला आल्या होत्या. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यात अनिल भोसले आणि रेश्मा भोसले हे आरोपी आहेत. 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्यानंतर रेश्मा भोसले भाजपच्या पाठिंब्यावर नगरसेविका बनल्या. मात्र तेव्हापासून अजित पवार आणि भोसले कुटुंबात वितुष्ट आले होते. 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अनिल भोसलेंना बॅंक घोटाळ्यात अटक करण्यात आली तर रेश्मा भोसले यांना जामीन मिळाला. मात्र आजारपणाचे कारण देऊन अनिल भोसले ससून रुग्णालयात भरती होते. मात्र ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर कैद्यांच्या 16 नंबर वॉर्डमधून अनेक कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात पाठवण्यात आले. त्यामध्ये माजी आमदार अनिल भोसले यांचाही समावेश आहे.
अनिल भोसले हे बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. मात्र गेल्या 130 दिवसांपासून त्यांचा मुक्काम पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये होते. हे दोघं नेमकं कशासाठी अजित पवारांची भेट घेणार होते, या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही आहे.
पालकमंत्री झाल्यावर बैठकांना धडाका
पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आज अजित पवारांनी बैठकांचा धडाका लावला आहे. पुण्यात वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ते बैठका घेत आहे. अजित पवारांचा हा कोणताही नियोजित दौरा नाही आहे तर हा दौरा राखीव म्हणून सांगण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार नेमक्या कोणत्या विभागाच्या बैठका घेणार आहेत?, यासंदर्भातील कोणतीही माहिती नाही. सकाळी पीडीसीसी बॅकेत त्यांनी हजेरी लावली होती. या बॅकेच्या य़ुपीआय सर्विसचा त्यांनी शुभारंभ केला. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी याच बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी या बॅंकेच्या अध्यक्षांची भेटदेखील घेतली आणि शुभेच्छादेखील दिल्या.
ड्रग्ज प्रकरणी अजित पवार अॅक्शन मोडवर
त्यानंतर सर्किट हाऊसमध्ये अजित पवार विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठका घेण्याची शक्यता आहे. पुण्यात सध्या चर्चेत असलेलं ससूनच्या ड्रग्ज रॅकेट संदर्भात अजित पवार अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. त्यांनी या ड्रग्ज रॅकेट संदर्भात माहिती घेण्यासाठी आणि पुढील नियोजन विचारण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बोलावून घेतलं होतं. त्यांच्याकडून ड्रग्ज संदर्भात माहिती घेतली. त्यानंतर ससून रुग्णलयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनादेखील बोलावून घेतलं होतं. या दोघांना नेमके कोणते प्रश्न विचारले यासंदर्भात कोणतीही माहिती अजून पुढे आली नाही आहे.
इतर महत्वाची बातमी-