एक्स्प्लोर

Pune Navale Bridge Accident: पुण्याच्या नवले ब्रीजवर गुरुवारची संध्याकाळ भयंकर अपशकुनी ठरली, डोळ्यांदेखत 8 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pune Navale Bridge Accident: भीषण अपघातनंतर वाहनांनी पेट घेतला आणि क्षणार्धात वाहनांचा सांगाडा दिसू लागला, घटनास्थळी पसरलेला धुर, वाहनांचे चेंदामेंदा झालेले भाग आणि जखमींच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं.

पुणे: पुण्यातील बंगळुरू पुणे महामार्गावरील नवले पूल परिसरामध्ये (Pune Navale Bridge Accident) काल (गुरुवारी, ता 13) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातानं शहर पुन्हा एकदा हादरलं. गुरूवारची संध्याकाळ ही आठ निष्पाप जिवांंसाठी 'काळाचा घाला' घालणारी ठरली. या भीषण अपघातनंतर (Pune Navale Bridge Accident)वाहनांनी पेट घेतला आणि क्षणार्धात वाहनांचा सांगाडा दिसू लागला, घटनास्थळी पसरलेला धुर, वाहनांचे चेंदामेंदा झालेले भाग आणि जखमींच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं.(Pune Navale Bridge Accident)

Pune Navale Bridge Accident: मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये एक ३ वर्षांची चिमुकलीचाही समावेश

दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या या भीषण अपघातामध्ये (Pune Navale Bridge Accident)काही क्षणांतच ८ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० ते २२ जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये एक ३ वर्षांची चिमुकलीचाही समावेश आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.(Pune Navale Bridge Accident)

Pune Navale Bridge Accident: कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना धडक दिली. दरम्यान, प्रामुख्याने कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिड्रोल टँकला आग लागली आणि क्षणार्धात आगीचे लोट दिसू लागले.

सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला देखील कंटेनरने पाठीमागून धडक दिली, कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला. कारमध्ये असलेले दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला

Pune Navale Bridge Accident: प्रत्यक्षदर्शी म्हणाले, आम्ही काहीच करू शकलो नाही...

प्रत्यक्षदर्शी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्व्हिस रोडवर असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पीत उभे होते. तितक्यात मोठा आवाज आल्याने ते हायवेच्या धावले आणि बघितले तर एक मोठा कंटेनर आठ ते दहा वाहनांना धडक देत येताना समोर दिसला. समोर एका कारला व ट्रकला धडक दिल्यानंतर तो कंटेनर जागेवर थांबला. मात्र क्षणार्धात कारने व कंटेनरने पेट घेतला. आग एवढी मोठी होती की अशा प्रसंगी आम्ही काहीच करू शकलो नाही.

Pune Navale Bridge Accident: नवले ब्रीज अपघातांची कारणे

तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणे अशक्य काही ठिकाणी सर्व्हिस रस्ते नसल्याने स्थानिक वाहनचालकांना महामार्गावरून प्रवास करावा लागतो. अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी उतारावरून 'न्यूट्रल' करून वाहन चालवत असल्याने वाहनांवरील ताबा सुटतो.

Pune Navale Bridge Accident: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल 

नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाला आहे. जखमी अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रॅक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Embed widget