(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune FDA News : अन्न व औषध प्रशासनाची पुण्यात धडक कारवाई; साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त
अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बोराडेवाडी, मोशी प्राधिकरण रिसरात मोठी कारवाई करण्याच आली आहे. प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने (FDA) बोराडेवाडी, मोशी (Moshi pune) प्राधिकरण (Food and Drug Administration) परिसरात मोठी कारवाई करण्याच आली आहे. प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखूचा सुमारे 6 लाख 49 हजार 20 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक (pan masala) आणि वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने दिली आहे.
या कारवाईत वाहन क्रमांक एमएच 14 एचयू 2042 या वाहनातून प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, व्ही 1 सुगंधित तंबाखु व एम सुगंधित तंबाखु इत्यादी पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठवण करणारे आरोपी किशोर हरकचंद सुंदेचा यांच्याविरूद्ध भोसरी औद्यागिक वसाहत पोलीस ठाणे, मोशी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून 18 जुलै 2023 च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखू जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण, विक्री यावर 1 वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.
FDA च्या धडाधड कारवाया...
काही दिवसांपूर्वी तुपाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या कारवाईत बनावट उत्पादनाचं 650 किलोग्रॅम तूप जप्त करण्यात आलं होतं. त्यासोबतच त्याच्या मिश्रणात वापरण्यात येणारा कच्चा मालही जप्त करण्यात आला होता. पुणे शहरातील पाषाण गावातील भगवतीनगर येथे टिन शेडमध्ये लपलेल्या भूमिगत कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कारखान्यावर निर्णायक छापा टाकला होता. छाप्यादरम्यान बुधवार पेठेतील रहिवासी असलेल्या संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (38) बनावट तूप तयार करत होता. खाण्यायोग्य सोयाबीन तेल आणि डालडा यांच्या संशयास्पद मिश्रणाचा वापर करून बनावट तूप तयार करताना राजपूतला रंगेहात पकडण्यात आलं होतं.
अशी करा तक्रार ...
याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.
इतर महत्वाची माहिती-
Dhirendra Shatri : धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अंनिस आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी