Pune Crime News : लोणावळ्यात आलिशान बंगल्यावर पॉर्न व्हिडिओ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 5 तरुणी ताब्यात
पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. लोणवळ्यातील एका बंगल्यावर हा गोरख धंदा सुरू असल्याचं कळताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
लोणावळा, पुणे : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यातच लैंगिक (Pune Crime news) अत्याचाराचं प्रमाणदेखील भरपूर आहे. अनेक ठिकाणी अवैध धंदेदेखील चालतात हे सगळे प्रकार सुरु असतानाच पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. लोणवळ्यातील एका बंगल्यावर हा गोरख धंदा सुरू असल्याचं कळताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. लोणावळ्यातील आर्णव व्हील या बंगल्यात हा प्रकार सुरु होता.
पोलिसांनी पॉर्न शूट करण्यासाठी लागणारा कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. त्यांच्याकडून शूट करण्यात आलेले काही पॉर्न व्हिडिओ ही जप्त केले आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यातून हे सर्व तरुण लोणावळ्यात एकत्र आले होते. भारतात पॉर्न व्हिडिओ बनवणे कायद्याने गुन्हा आहे. असे व्हिडिओ बनवणे बंदी आहे.या सर्व आरोपीविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि. कलम 292,293,34. माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67,67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3,4,6,7.अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विश्णु मुन्नासाहब साओ (वय-30, रा.16 परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय-35, रा. आहरा उमरी, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय 23, रा. आरपी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय 38, रा. गणेशपुरी, मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय 21, रा.लक्ष्मीनगर, शखरपुर, दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय-29, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय 26, रा. अमरोहा, राईड मॉक्सी, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (वय 29, रा. काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय 21, रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय 32, रा. केंगार चाळ, खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय 28, रा. सनसिटी, नालासोपारा वेस्ट, जि. पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय 38, रा. मोहनचाळ, वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय 19, व्यवसाय मेकअप आर्टीस्ट, रा. रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय 21, रा. डेहराखास, डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (वय 20, रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) यांच्यासह बंगला चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-