एक्स्प्लोर

Ajit Pawar: विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा... अजित पवारांची मविआच्या नेत्यांना वॉर्निंग

Vidhan Sabha Adhiveshan MLAs oath: विरोधकांनी उद्या संध्याकाळपर्यंत शपथ न घेतल्यास त्यांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही, असा इशारा अजित पवार यांच्याकडून देण्यात आला.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून सुरु झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथविधीवरच बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येताना दिसले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या कृतीची खिल्ली उडवत हा रडीचा डाव असल्याचे म्हटले. ते शनिवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मी महाविकास आघाडीत काम केले आहे, मी त्यांचा कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम मशिनला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. पण विधानसभेला पराभव होताच त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीत प्रत्येकाला काय बोलायचं हा अधिकार आहे. पण विरोधकांना शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल. ती एक प्रोसिजर आहे. तरच त्यांना परवा सभागृहातील कामकाजात सहभागी होता येईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

विरोधकांनी पहिल्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय, असे दाखवायचे आहे. आम्ही संख्येने कमी असलो तरी अस्तित्व दाखवण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे. या सगळ्याला अर्थ नाही. सुरुवातीला विरोधाक आत बसले होते. आठ-दहा लोकांची शपथ झाल्यावर ते सभागृहातून बाहेर जायला निघाले. त्यावेळी मी त्यांना विचारले, कुठे चाललात? त्यावर विरोधक म्हणाले, असंच बाहेर जात आहोत. मी बाहेर आल्यावर कळालं की विरोधकांनी आज शपथ घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. 

आयकर विभागाने 1000 कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवली, विरोधकांच्या आरोपावर अजित पवार हसून म्हणाले...

अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांची 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार हसले. त्यांनी म्हटले की, मी इतकी वर्षे त्यांच्यासोबत होतो. मी भ्रष्टाचारी आणि दोषी असतो तर मविआने माझ्यासोबत काम केले नसते. कोर्टाचा निकाल एका दिवसात येत नाही. यासंदर्भात प्रोसेस सुरु होती. मला जिथे न्याय मिळेल असं वाटत होते, तिकडे मी गेलो आणि न्याय मागितला. विरोधकांसाठी मी त्यांच्यासोबत असला की चांगला असतो. राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. 

आणखी वाचा

अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Embed widget