आता प्रति सरकार बनवा, शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा, तर उरलेली साडेचार वर्ष राहुल गांधींना द्या, पडळकरांचा खोचक टोला
ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विरोधगकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही निवडून तरी आले असते का? असा सवालही त्यांनी केला.
Gopichand Padalkar on Sharad Pawar : ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विरोधगकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही निवडून तरी आले असते का? असा सवाल पडळकरांनी केला आहे. ईव्हीएमसंदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिनडोकपणा आहे. विरोधक दिवाळीच्या दिवशी शिमगा करत आहेत, हे चुकीचं असल्याचे पडळकर म्हणाले. यावेळी पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली.
शरद पवारांसह राहुल गांधींना लगावला टोला
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं म्हणून झालेल्या आंदोलनाच्या मुद्यावर देखील गोपीचंद पडळकरांनी टीका केली. तुम्ही तुमचंच प्रति सरकार बनवा. मारकडवाडी पॅटर्ननंच तुम्ही आता निवडून येऊ शकता. तुम्हाला जनतेनं नाकारलं असल्याचे शरद पवार म्हणाले. तुमच्या प्रति सरकारमध्ये शरद पवारांना निवडून आणा आणि सहा महिने पंतप्रधान बनवा. तर राहुल गांधी यांना पुढे साडेचार वर्ष द्या. मारकडवाडीतील शेतातच शपथ द्या असा खोचक टोला पडळकरांनी लगावला. तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर लोकांना देखील संधी द्या असं म्हणत पडळकरांनी मविआच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
दरम्यान, सध्या राज्यात ईव्हीएमच्या मुद्यावरुमन वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येताना दिसत आहेत. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागमी देखील केली जातेय. तसेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर संशय देखील व्यक्त केला जात आहे. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
आजपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
आजपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथविधीवरच बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येताना दिसले. दरम्यान, सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज शपथ घेतली आहे. त्यामुळं आता विरोधी पक्षाचे आमदार कधी शपथ घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. सोमवारी सर्व विरोधी पक्षाचे आमदार शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
महत्वाच्या बातम्या: