एक्स्प्लोर

Pune Accident : बापानंतर आता आजोबाचा नंबर; ड्रायव्हरला डांबून ठेवणे, जीवे मारण्याची धमकी प्रकरणी सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी

Pune Porsche Car Accident : नातवाचा आरोप स्वतःवर घे आणि त्या रात्री गाडी तू चालवत होतास हे पोलिसांना सांग असं सांगत ड्रायव्हरला जीवे मारण्याची धमकी सुरेंद्र अगरवालला भोवली आहे. 

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.  आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

जेव्हा अपघात घडला त्यावेळी सुरेंद्र अगरवाल याने त्याच्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. गाडी तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला सांगितलं. तसेच सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोपही  त्याच्यावर आहे. 

या आधी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांची एकत्रित चौकशी करायची आहे, त्यामुळे सुरेंद्र अगरवालला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.

दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला विरोध केला. आरोपी हा 77 वर्षांचा असून तो कुठेही पळून जाऊ शकत नाही, तसेच पुराव्यांशी छेडछाड तो करू शकत नाही असा यु्क्तिवाद केला. पण न्यायालयाने पोलिसांनी मागणी मान्य केली आणि आरोपी सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

तपास अधिकाऱ्यांचा युक्तिवाद काय? 

आरोपी वारंवार परदेशात जातो त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. ⁠घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. ⁠पण ज्या गाडीतून डायवरचे अपहरण केले होते ती गाडी जप्त करायची आहे, ⁠फोन जप्त करायचे आहेत. आरोपीने सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली आहे. त्याचा तपास करायचा आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जर आरोपी सहकार्य करतो म्हणतात मग त्यांनी मोबाईलची माहिती का दिली नाही? ड्रायव्हरचे कुटुंबीय केसनंदला राहतात आहेत, त्यांचं तिथं घर आहे. तरी आरोपी म्हणतात ड्रायव्हर आमच्यासोबत राहतो ⁠सुरेंद्र आणि त्याचा मुलगा विशाल यांची एकत्रित चौकशी करायची आहे. 

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद काय?

आरोपी 77 वर्षांचे सिनियर सीटिझन आहेत. ही ⁠देशातील पहिली घटना असेल ज्यात अपघात प्रकरणी वडील आणि आजोबांना अटक झाली आहे. फिर्यादीचे, ड्रायव्हरचे अपघाताच्या दिवशी जबाब पोलिसांनी घेतला आहे. ड्रायव्हरच्या जीवाला धाका होता. त्याने स्वतः हून म्हटलं होतं मी आजच्या दिवस इथे राहू का? घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अनेकदा तपासासाठी नेले आहे. अनेक तास चौकशी केली आहे. त्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. आरोपीला ⁠पॅरॅलिसीसचा ॲटक आला आहे, हार्टचे ॲापरेशन झाले आहे. त्याच्या मणक्याला दुखापत आहे. ते सर्व ऑन पेपर आहे. ⁠मुलाचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे ते कोठे पळून जात नाहीत. त्यांच्या जेलमध्ये जाऊन तपास करायला आमची हरकत नाही. आम्ही तसे लेखी देतो. म्हणून यांना पोलीस कोठडी देऊ नका. सिनीयर सीटीझन आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget