Manipur Violence : मणिपूरचा राजकुमार महाराष्ट्राचा जावई, संगीताच्या माध्यमातून सुचवले मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर
Manipur Violence : मणिपूरच्या राजघराण्यातील राजकुमार बिक्रमजीत हे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी एका मराठमोळ्या मुलीशी लग्न केलं आहे.
![Manipur Violence : मणिपूरचा राजकुमार महाराष्ट्राचा जावई, संगीताच्या माध्यमातून सुचवले मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर Manipur violence manipur rajkumar relation with maharashtra pune suggested some thoughts to solve manipur problem detail marathi news Manipur Violence : मणिपूरचा राजकुमार महाराष्ट्राचा जावई, संगीताच्या माध्यमातून सुचवले मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/05/df5c5eabbcaaef96577f3b39fafa83c41691229525007720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Manipur Violence : सध्या मणिपूरमध्ये (Manipur) काही केल्या शांतत प्रस्थापित न होण्याची चिन्ह आहेत. पण या मणिपूरमधील एका राजकुमाराचं थेट महाराष्ट्राशी (Maharashtra) नातं जोडलं गेलं आहे. राजकुमार बिक्रमजीत सिंग हे मणिपूरच्या राजघराण्याचे सदस्य आहेत. बिक्रमजीत सिंग हे मागील 30 वर्षांपासून पुण्यात (Pune) राहत आहेत. त्यांनी एका मराठमोळ्या मुलीशी लग्न केलं आहे. त्यांनी पुण्यात स्थायिक असलेल्या सोनल नाईक यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. बिक्रमजीत सिंग यांनी आपलं अर्ध आयुष्य पुण्यात घालवलं आहे. पुण्यातील महंमदवाडी भागात ते स्थायिक आहेत. पण त्यांच जगणं जरी पुण्यात असलं तरी त्यांच्या हृदयाचे ठोके हे मणिपूरसाठी आहेत.
संगीताचा ध्यास आणि मणिपूरची आस
राजकुमार बिकेरमजीत सिंग हे उत्तम बासरी वादक आहेत. इतकंच नव्हे तर ते भारतातील उत्तम बासरी वादकांपैकी एक आहेत. राजकुमारांचे बासरी वादनाचे जवळपास 250 पेक्षा जास्त अल्बम प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांना 2007 साली राजकुमारच्या हिमालयीन व्हिस्पर या अल्बमल वर्ल्ड ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकन देखील मिळाले होते. अचोबी सना हे राजकुमार बिक्रमजीतचे मूळ नाव आहे. राजघराण्याच्या या सदस्याने आपल्या संगीतातून मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर सुचवले आहे. त्यांनी मणिपूरच्या प्रश्नावर संगीताच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
राजकुमार यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना म्हटलं आहे की, जेव्हा तुम्ही बासरी वाजवता तेव्हा वातावरणाशी बांधले जाता. त्यामुळे लोक आकर्षित होतात. तर संगीताच्या जोरावर राजकुमार बिक्रमजीत मणिपूरला शांततेचा संदेश दिला आहे. राजकुमार बिक्रमजीत त्याच मीतेई राजघराण्यातील आहेत. राजकुमार बिक्रमजीत त्याच मीतेई राजघराण्यातील आहेत, ज्यांनी ब्रिटीश राजवटीत कुकीला म्यानमारमधून बोलावले होते. राजकुमार बिक्रमजीत यांच्या मते मणिपूरमधील कुकी आणि मीतेई एकत्र बसायला तयार नाहीत म्हणून जे मणिपूरच्या बाहेर राहतात ते पुढाकार घेऊ शकतात.
मातृभूमीशी जोडली गेली नाळ
सध्या मणिपूरमध्ये जी अराजकता माजली आहे त्यामध्ये शांतता निर्माण करणं हे काठिण्य पातळीवर आहे. येथील नागरिकांचा संघर्ष, त्यांची वाताहात, त्यांचं दु:ख हे कदाचित सामान्य माणसाच्या विचारक्षमतेच्या पलिकडे आहे. पण गेली अनेक वर्ष आपल्या मातृभूमीपासून दूर राहूनही तिच्याशी जोडली गेलेली नाळ ही कधीही तुटली जात नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजकुमार बिक्रमजीत आहेत. त्यांची त्यांच्या मातृभूमीसाठी असलेली तळमळ ही कायमच वाखाणण्याजोगी राहिल. त्यामुळे सरकारपेक्षा मणिपूरशी नाळ जोडली गेलेल्या लोकांना वाटणारी ही तळमळ तरी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी फायदेशीर ठरेल का याचं उत्तर येणारा काळच देईल.
हेही वाचा :
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक, सुरक्षारक्षक आणि स्थानिकांमध्ये चकमक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)