एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash CCTV: अजित पवारांच्या विमान अपघाताचा थरारक CCTV समोर; स्फोट अन् आगीचे, धुरीचे लोट, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO

Ajit Pawar Plane Crash CCTV: . बारामती विमानतळाजवळच त्यांचं विमान कोसळलं. लँडिंगसाठी तांत्रिक अडथळा आल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यांचं विमान ८ वाजून ४६ मिनिटांनी कोसळलं आणि स्फोट झाला.

Ajit Pawar Baramati Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना आज (28 जानेवारी) अजित पवार यांच्या विमानाचा लॅंडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. (Ajit Pawar Plane Crash)  अपघात झाला  त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात पाच जण होते. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक देखील होते. दोन कॅप्टन, एक क्रू मेंबर आणि एका सहकाऱ्याचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुजेट आता समोर आलेलं आहे.

सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी हा भीषण अपघात झाला

अजित पवारांच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा स्फोट किती मोठा होता ते दिसून येते. आज (बुधवारी, ता २८) सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी हा भीषण अपघात झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी विमानाचा मोठा स्फोट झाला होता, आगीचे आणि धुराचे लोट परिसरात पसरले, जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये हा अपघात रेकॉर्ड झाला, विमान बारामती मध्ये लँड करत असतानाच हा अपघात झाला आणि क्षणार्धात विमानाने पेट घेतला, यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानाचा स्फोट झाल्यानंतर त्याचे तुकडे आजूबाजूला असणाऱ्या घरांच्या परिसरामध्ये जाऊन पडले. मोठा आवाज झाल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अजित पवार हे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून थेट बारामतीत अजित पवार आले होते. बारामती विमानतळाजवळच त्यांचं विमान कोसळलं. लँडिंगसाठी तांत्रिक अडथळा आल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यांचं विमान ८ वाजून ४६ मिनिटांनी कोसळलं आणि स्फोट झाला. विमानमध्ये असलेल्या ५ जणांचं निधन झाल्याची माहिती आहे.

Ajit Pawar Baramati Plane Crash:  बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लॅंड होऊ शकले नाही अन्...

अजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला आहे. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लॅंड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. जिथे हे विमान कोसळले तिथे खोलगट भाग आहे. आजुबाजुला झाडं झूडपं आणि उस शेती आहे. शेजारी काही घरांची वस्ती आहे. या विमानाचा जळून कोळसा झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील कागदपत्रं सहिसलामत राहिलीत. कदाचित विमान जमिनीवर कोसळल्यानंतर विमानाचे दोन तूकडे झाले आणि कागदपत्रं बाहेर फेकली गेली .

Ajit Pawar Baramati Plane Crash: विमानात कोण कोण होते?

अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

Ajit Pawar Baramati Plane Crash: असा झाला अपघात?

1. सकाळी 8.10 मिनिटं

मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं बारामतीकडे उड्डाण

अजित पवारांसह 5 जण विमानात

2. सकाळी 8.40 मिनिटं

विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होते

विमानात तांत्रिक बिघाड

3. सकाळी 8.46 मिनिटं

तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं नियंत्रण सुटलं

बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं

अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू

मृत्युंजय सिंह हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा 18 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP News मध्ये डे. ब्युरो महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत. शिवाय एबीपी माझा या महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनीसाठीही ते सखोल वार्तांकन करतात. गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर सखोल रिपोर्टिंग करण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षण विषयांतही विशेष रुची आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget