एक्स्प्लोर

Ajit Pawar on Baramati Loksabha : चुरशीच्या लढतीत बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरला; अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीमध्ये लढत होत आहे. मात्र, टक्का घसरल्याने दोन्ही गटातही अस्वस्थता आहे.

Ajit Pawar on Baramati Loksabha : अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागून बारामतीसाठी लोकसभेला सर्वात कमी मतदान झाल्याने नेमका कोणाला तोटा होणार आणि कोणाला फायदा होणार? याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीमध्ये लढत होत आहे. मात्र, अपेक्षित मतदान न होता थेट 2019 च्या तुलनेत टक्का घसरल्याने दोन्ही गटातही अस्वस्थता आहे. पैशांचा वापर झाल्याचाही आरोप होत आहे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये घटलेल्या मताधिक्यावर भाष्य केलं आहे. 

शिखर बँक प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आल्याने अजित पवारांची पुन्हा अडचण वाढणार असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपापला अधिकार आहे, त्यानुसार त्यांनी याचिका दाखल केली असेल. न्याय व्यवस्था त्याचा निर्णय घेईल.

काय कौल दिला आहे हे निकालानंतर कळेल

अजित पवार यांनी सांगितले की, लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का कमी झाला, पण बारामतीत थोडं वाढलं आहे.  इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे मतदान झालेलं नाही. बारामतीमध्ये कसंबसं 60 टक्के मतदान झालं आहे. मतदारांनी मतदान करुन काय कौल दिला आहे हे निकालानंतर कळेल. मतदान कमी झाल्याने चिंता नाही. मागच्या वेळीपेक्षा बारामतीची तुलना करता मतदानाचा टक्का वाढला आहे. कालपासून शिरुर मावळ पुणे लोकसभा मतदारसंघात कामाला सुरुवात केल्याचे ते म्हणाले. 

बारामतीच्या निवडणूक आयोगाकडे तक्रारींवरही अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, दोघांनीही एकमेकांवर तक्रारी केल्या आहेत. अशा तक्रारी होत असतात, त्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. पीडीसीसी बँक उघडी असेल, तर चौकशी करावी, सीसीटीव्ही पाहून कारवाई करा, असे अजित पवार म्हणाले. 

आव्हान देणाऱ्याला महत्व देत नाही

अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आव्हानावर म्हणाले की, अमोल कोल्हे आव्हान देत असतील, तर त्यांचे काम करतात, पण मी कामाचा माणूस आहे. आव्हान देणाऱ्याला महत्व देत नाही. जो मला आव्हान देतो त्याला खासदारकीचे तिकिट मीच देऊन निवडूनही आणलं होतं. दिवस बदलत असतात, त्यांना करायचे ते करु द्या, आम्ही जनतेला सांगू. ते पुढे म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी जनसंपर्क ठेवला नाही. राजीनामा देणार होते, पण असा काय चमत्कार घडला? अभिनय क्षेत्रातील असल्याने खासदार म्हणून काम करणं अशक्य असल्याची भूमिका कोल्हेंची होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होईल का?

अजित पवार यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याचे विधान शरद पवारांनी केलं. मात्र हे त्याचे वैयक्तिक असेल. त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी काय विचार करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. निवडणूक सुरु झाल्यापासून देश आणि राज्य पातळीवरील पक्ष आहे. साऊथमध्ये राज्य पातळीवरील पक्ष जास्त ताकदवान असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget